अल्पवयीन मुलावर अत्याचार

By Admin | Updated: October 15, 2016 04:33 IST2016-10-15T04:33:02+5:302016-10-15T04:33:02+5:30

एक नऊ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणात अटक केलेली पाच मुले १३ ते १५ वयोगटातील तर एक मुलगा

Atrocity on a minor child | अल्पवयीन मुलावर अत्याचार

अल्पवयीन मुलावर अत्याचार

विरार : एक नऊ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणात अटक केलेली पाच मुले १३ ते १५ वयोगटातील तर एक मुलगा १८ वर्षांचा अहे.
नालासोपारा पूर्वेकडील नगीनदास पाडा परिसरातील या मुलावर त्याच परिसरात राहणारी सहा मुले गेल्या सात महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करीत होती. त्याची व्हिडीओ क्लिप मोबाइलमध्ये मुलांनी बनवली होती. त्या क्लिपच्या आधारे ही मुले पीडित मुलाला ब्लॅकमेल करीत अत्याचार करीत होती. दोन दिवसांपूर्वी त्या मुलाने या प्रकाराला विरोध केला असता या मुलांनी त्याला मारहाण केली. हा प्रकार तिथे राहणाऱ्या एका मुलाने पाहिला आणि मुलाच्या पालकांना याची माहिती दिली. पालकांनी थेट तुळींज पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
या तक्रारीनंतर तुळींज पोलिसांनी शुक्रवारी रात्री ६ मुलांना अटक केली. त्यांच्याकडून मोबाइल जप्त केला असून, तो न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. या सर्व मुलांवर पोक्सो आणि अनैसर्गिक बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Atrocity on a minor child