वकिलाकडून पत्नीवर अत्याचार
By Admin | Updated: July 30, 2014 02:09 IST2014-07-30T02:09:49+5:302014-07-30T02:09:49+5:30
विवाहित असूनही दुसरे लग्न करून पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करणा:या वकिलाला माहीम पोलिसांनी अटक केली. या आरोपीने अत्याचाराचे चित्रीकरणही केले

वकिलाकडून पत्नीवर अत्याचार
मुंबई : विवाहित असूनही दुसरे लग्न करून पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करणा:या वकिलाला माहीम पोलिसांनी अटक केली. या आरोपीने अत्याचाराचे चित्रीकरणही केले असल्याची माहिती पीडित महिलेने पोलिसांना दिली असून, याबाबत अधिक चौकशी करीत आहेत.
माहीम परिसरात राहणा:या या तरुणीची वर्षभरापूर्वी आरोपी निहाल वाहब बगाडीया (28) याच्यासोबत ओळख झाली. वकील असलेला हा आरोपी ब्रिच कँडी परिसरातील शंकर महल या इमारतीत कुटुंबीयांसोबत राहतो. ओळखीनंतर काही दिवसांतच त्यांची मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. जुलै 2क्13 मध्ये बगाडीयाने तिच्यासोबत विवाह केला. मात्र लग्न झाल्यापासून हा आरोपी महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार करीत होता. आरोपीने महिलेवर केलेल्या अत्याचाराचे व्हिडीओ चित्रणही केले आहे. मात्र बगाडीयाचे तीन वर्षापूर्वीच पहिले लग्न झाल्याचे या महिलेला समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने ही बाब तिच्या कुटुंबीयांना सांगितली. त्यानुसार त्यांनी
सोमवारी माहीम पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)