अघोरी विद्येच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 05:26 IST2018-04-30T05:26:20+5:302018-04-30T05:26:20+5:30

नागपूर जिल्ह्यातील १७ वर्षीय मुलीला भूतबाधा झाली आहे. तिच्या अंगातील भूत काढून देतो, असे म्हणून अघोरी विद्येच्या नावाखाली मात्रिकाने तिच्यावर दोनदा अत्याचार केल्याची घटना रविवारी उघडकीस आली.

Atrocities against a minor girl in the name of ahghori theory | अघोरी विद्येच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अघोरी विद्येच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अत्याचार

भद्रावती (चंद्रपूर) : नागपूर जिल्ह्यातील १७ वर्षीय मुलीला भूतबाधा झाली आहे. तिच्या अंगातील भूत काढून देतो, असे म्हणून अघोरी विद्येच्या नावाखाली मात्रिकाने तिच्यावर दोनदा अत्याचार केल्याची घटना रविवारी उघडकीस आली.
पीडित मुलीच्या तक्रारीवरून मांत्रिक मुन्ना समशेर खान रमजान पठाण, किशोर भाऊराव वाळके, आशिष पद्माकर कांबळे यांना पोलिसांनी अटक केली. गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती ठीक नसल्याने पीडित मुलीला मांत्रिकाकडे दाखविण्याकरिता आई-वडिलांनी भद्रावती येथील आशिष कांबळे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर किशोर वाळके याने नागपूर येथील मुन्ना नामक मांत्रिकाचा पत्ता दिला. त्यानुसार २२ एप्रिलला मांत्रिकाने भद्रावती येथील वाळके यांच्या घरी कुटुंबाला बोलावून घेतले. बंद खोलीमध्ये तिच्या अंगावरून तीन तास भूत काढावयाचे आहे, असे सांगत पूजापाठ करून तिला विवस्त्र केले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. तिन्ही आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Atrocities against a minor girl in the name of ahghori theory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.