मतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By Admin | Updated: January 10, 2016 00:56 IST2016-01-10T00:56:06+5:302016-01-10T00:56:06+5:30
एका दुकानदाराने मतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याीच घटना लाखांदूर तालुक्यातील खैरी (पट) येथे घडली. घटनेच्या दोन महिन्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

मतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार
लाखांदूर (भंडारा) : एका दुकानदाराने मतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याीच घटना लाखांदूर तालुक्यातील खैरी (पट) येथे घडली. घटनेच्या दोन महिन्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
भीमराव गायकवाड (३५) असे आरोपीचे नाव असून त्याचे किराणा दुकान आहे. १४ वर्षीय पीडित मुलगी त्याच्या दुकानात जायची. त्याने दोन महिन्यांपूर्वी तिच्यावर अत्याचार केला. याची माहिती तिने कुटुबियांना दिली. तेव्हा तिच्या आईने लाखांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही.
त्यामुळे गायकवाड पुन्हा त्या मुलीला त्रास देऊ लागला. याबाबत तिच्या कुटुंबियांना कळताच शनिवारी पुन्हा तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर लाखांदूर पोलिसांनी भादंवि ३७६ कलमान्वये गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (प्रतिनिधी)