बालगुन्हेगारावर अत्याचार

By Admin | Updated: June 10, 2016 02:27 IST2016-06-10T02:27:44+5:302016-06-10T02:27:44+5:30

इंडस्ट्रीयल स्कूलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या एका अल्पवयीन गुन्हेगाराने दुसऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली.

Atrocities against BalGuigara | बालगुन्हेगारावर अत्याचार

बालगुन्हेगारावर अत्याचार


मुंबई : माटुंगा येथील डेव्हिड ससून इंडस्ट्रीयल स्कूलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या एका अल्पवयीन गुन्हेगाराने दुसऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. या
प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी अल्पवयीन गुन्हेगाराविरोधात धमकावून अनैसर्गिक अत्याचार, पॉस्को कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व तक्रारदार मुले एकाच खोलीत राहत होती. मात्र अत्याचारानंतर आरोपी मुलाच्या धमकीला तक्रारदार घाबरला. ६ जूनला या दोघांना वेगवेगळ्या खोलीत ठेवण्यात आले. त्यानंतर तक्रारदार मुलाने घडलेला प्रसंग शहा यांच्या कानावर घातल्याने हे प्रकरण उघडकीस आले. बुधवारी स्कूलच्या अधिकारी प्रभावती शहा यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक गंगाधर सोनवणे यांनी दिली. या प्रकरणातील तक्रारदार व आरोपी १७ वर्षांचे आहेत. तक्रारदार मारामारीच्या गुन्ह्यात तर आरोपी जबरी चोरीच्या गुन्ह्यात दोषी आढळले. तक्रारदार मुलाच्या दाव्यानुसार २९ मे व १ जूनच्या मध्यरात्री आरोपीने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती गंगावणे यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Atrocities against BalGuigara