अणुऊर्जाच तारणार!
By Admin | Updated: April 22, 2015 04:16 IST2015-04-22T04:16:10+5:302015-04-22T04:16:10+5:30
पृथ्वीवरील मनुष्यप्राण्याचा आर्थिक विकास झपाट्याने होत असला तरी त्याच्या गरजा सातत्याने वाढत आहेत. भविष्यात या गरजा अधिक वाढणार असून

अणुऊर्जाच तारणार!
सचिन लुंगसे, मुंबई
पृथ्वीवरील मनुष्यप्राण्याचा आर्थिक विकास झपाट्याने होत असला तरी त्याच्या गरजा सातत्याने वाढत आहेत. भविष्यात या गरजा अधिक वाढणार असून, भविष्यकाळातील ऊर्जेची टंचाई लक्षात घेता अणुऊर्जा आणि सौरऊर्जा मनुष्यप्राण्याला दिलासा देईल, असे स्पष्ट मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. अणुऊर्जा विकासासह पर्यावरणालाही पूरक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या देशासह राज्यात विजेची टंचाई आहे. विजेच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाही. शिवाय भारनियमनही सुरूच असून, विजेचे दरही प्रतियुनिट गगनाला भिडल्याने उद्योजकांसह सर्वसामान्य वीजग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. कोळसा, तेल आणि वायू असे वीजनिर्मितीचे नैसर्गिक स्रोत आटत चालले आहेत. तसेच त्यापासून होत असलेल्या प्रदूषणामुळे वसुंधरेचा गळा घोटला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ‘जागतिक वसुंधरा दिना’चे औचित्य साधत ‘लोकमत’ने वसुंधरा दिन, पर्यावरण आणि अणुऊर्जा या विषयांचा समन्वय साधत अनिल काकोडकर यांच्याशी संवाद साधला.
या वेळी अनिल काकोडकर म्हणाले की, भारतासारख्या विकसनशील देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तिसरीकडे सुबत्तादेखील वाढत आहे. त्यामुळे साधनसंपत्तीवर ताण येतो. आजघडीला ऊर्जेची गंभीर परिस्थिती आहे. वातावरणात बदल होत आहेत. काही काळाने यात आणखी वाढ होणार आहेत. विशेष म्हणजे, ही वस्तुस्थिती आपणास माहीत असूनही आपण ते स्वीकारत नाही
आहोत.