शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी  खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर; विज्ञान कथालेखकाला पहिल्यांदाच मान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 2:28 AM

यंदाचे साहित्य संमेलन नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसमध्ये होणार असून रसिकांच्या सोयीचा विचार करून २६ ते २८ मार्च या काळात संमेलन होईल

नाशिक : दीड दशकानंतर यंदा नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच एका विज्ञान कथालेखक आणि संशोधकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याने नाशिकचे संमेलन सर्वार्थाने वेगळे ठरणार आहे.   

अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत संमेलनाध्यक्षांच्या निवडीची घोषणा केली. महामंडळाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत डॉ. नारळीकर यांच्या नावाला बहुमताने पसंती देण्यात आली. महामंडळाच्या पुणे विभागीय कार्यालयाने डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावाचा प्रस्ताव पाठविला होता. तेव्हापासूनच डॉ. नारळीकर यांच्या नावाची चर्चा होऊन रविवारी त्यावर मोहोर उमटवण्यात आल्याचे ठाले पाटील यांनी नमूद केले.    तिन्ही दिवस उपस्थिती डॉ. नारळीकर हे तिन्ही दिवस संमेलनाला उपस्थित राहणार असून त्यांचे संमतीपत्र महामंडळाला प्राप्त झाले आहे. संमेलनाचे उद्घाटन राजकीय क्षेत्रातील मान्यवरांपेक्षा एखाद्या मोठ्या लेखकाच्याच हस्ते केले जाणार असल्याचे ठाले पाटील यांनी स्पष्ट केले.

२६ मार्चला संमेलनाची सुरुवात  यंदाचे साहित्य संमेलन नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसमध्ये होणार असून रसिकांच्या सोयीचा विचार करून २६ ते २८ मार्च या काळात संमेलन होईल, असे ठाले पाटील यांनी सांगितले. २६ मार्चला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडीने या संमेलनाची सुरुवात होईल.    

किर्लोस्करांचे ते भाकीत खरे ठरले!‘खूप वर्षांपूर्वी ‘किर्लोस्कर’ मासिकात माझी कथा छापून आली होती; तेव्हा मुकुंदराव किर्लोस्कर म्हणाले होते की, तुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हाल; तेव्हा मी म्हणालो की, ‘मी स्वत:ला साहित्यिक समजत नाही. साहित्यातील माझा अनुभव कमी आहेे.’ पण आज किर्लोस्करांचे ते भाकीत खरे ठरले. 

टॅग्स :Jayant Narlikarजयंत नारळीकर