सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या
By Admin | Updated: May 28, 2015 00:34 IST2015-05-28T00:34:56+5:302015-05-28T00:34:56+5:30
राज्य शासनाने राज्यातील ८८ पोलीस उपअधीक्षक तथा सहायक आयुक्तांच्या बदल्या बुधवारी जाहीर केल्या.

सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या
पुणे : राज्य शासनाने राज्यातील ८८ पोलीस उपअधीक्षक तथा सहायक आयुक्तांच्या बदल्या बुधवारी जाहीर केल्या. या बदल्यांमध्ये पुणे शहर पोलीस दलासह अन्य यंत्रणांमधील एकूण दहा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. तर, अकरा पोलीस
अधिकारी पुण्यामध्ये बदलून आले आहेत. पुण्यामधून बदलून
गेलेल्या अधिकाऱ्यांचा तपशील पुढीलप्रमाणे-
सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे (उपविभागीय अधिकारी, वाशिम), रमेश गायकवाड (सहायक आयुक्त, औरंगाबाद), राजन भोगले (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), गोपीनाथ पाटील (सहायक आयुक्त, सोलापूर), राजेंद्र साळुंखे (उपविभागीय पोलीस अधिकारी, मलकापूर), जगदीश लोहळकर (एसआयडी), शिवकुमार निपुणगे (लोहमार्ग पुणे ते सीआयडी पुणे), सतीश पाटील (पीएडब्ल्यू ते औरंगाबाद), राजेंद्र धांदले (सीआयडी ते रायगड) अशी बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. पुण्यामधून बदलून गेलेल उपायुक्त राजेश बनसोडे यांची श्रीरामपूर येथे झालेली बदली रद्द करून, त्यांची कोल्हापूर सीआयडीमध्ये बदली करण्यात आली आहे. तर, पुणे सीआयडीच्या गुन्हे शाखेचे अधीक्षक म्हणून डी. वाय. मंडलिक यांची नेमणूक करण्यात आली आहे.
पुण्यात आलेले अधिकारी-
प्रफुल्ल क्षीरसागर (एसीबी, मुंबई ते उपविभागीय अधिकारी रेल्वे, पुणे), प्रवीण कुलकर्णी (सहायक आयुक्त, औरंगाबाद ते पुणे), शंकर केंगार (उपविभागीय अधिकारी, गंगाखेड ते पुणे), तुकाराम गौड (नागपूर ते पुणे), मोहन विधाते (उपविभागीय अधिकारी, तुळजापूर ते पुणे), रशीद ताडवी (अतिरिक्त अधीक्षक एसीबी अमरावती ते पुणे), विजयकुमार भोईटे (अतिरिक्त अधीक्षक एसीबी मुंबई ते पुणे), राम मांडुरके (उपविभागीय अधिकारी, सिल्लोड ते पुणे), अर्जुन सकुंडे (एसीबी मुंबई ते एसीबी पुणे ), श्यामकुमार निपुनगे (लोहमार्ग पुणे ते सीआयडी क्राईम, पुणे).