सहायक मोटार वाहन निरीक्षकांची पदे भरणार!
By Admin | Updated: February 2, 2015 04:43 IST2015-02-02T04:43:38+5:302015-02-02T04:43:38+5:30
: राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालये दलालमुक्त करण्याची मोहीम हाती घेणारे परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी आता या कार्यालयातील रिक्त अधिकारी

सहायक मोटार वाहन निरीक्षकांची पदे भरणार!
अकोला : राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालये दलालमुक्त करण्याची मोहीम हाती घेणारे परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी आता या कार्यालयातील रिक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरण्यावर दिला आहे़ त्यानुसार सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या रिक्त जागा लवकरच भरण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले़ तसेच उच्चस्तरीय सचिव समिती व शासनाने ३१ जानेवारी रोजी मोटार वाहन विभागामध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षकांची ३०० नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता दिली.
राज्यातील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयामध्ये शेकडो जागा रिक्त असून, त्या ठिकाणी नवीन जागा निर्माण करण्याची मागणी परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी केली होती. त्यानुसार उच्चस्तरीय सचिव समिती व शासनाने नवीन जागा निर्मितीस मंजुरी दिली आहे. राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये आवश्यकतेनुसार साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पद मंजूर करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)