सहाय्यक फौजदाराला शिवीगाळ

By Admin | Updated: February 16, 2017 03:57 IST2017-02-16T03:57:11+5:302017-02-16T03:57:11+5:30

पोलीस स्टेशनला बोलावून ‘तु मला वाईट का बोलला’ असे म्हणत पोलीस रेकॉर्डवरील सतीश रामदास कासार या गुन्हेगाराने सहायक

Assistant Faujdar | सहाय्यक फौजदाराला शिवीगाळ

सहाय्यक फौजदाराला शिवीगाळ

जळगाव : पोलीस स्टेशनला बोलावून ‘तु मला वाईट का बोलला’ असे म्हणत पोलीस रेकॉर्डवरील सतीश रामदास कासार या गुन्हेगाराने सहायक फौजदाराला शिवीगाळ करुन त्यांच्या दुचाकीची चावी हिसकावल्याची घटना मंगळवारी सकाळी शाहू नगरात घडली. याप्रकरणी कासार याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार सतीश सुरळकर हे मंगळवारी सकाळी दुचाकीने पोलीस स्टेशनकडे येत असताना याकुब बांगी या सामाजिक कार्यकर्त्याजवळ थांबले. तेथे त्यांच्याशी बोलत असताना सतीश उर्फ पिंट्या कासार हा तेथे आला व आरडाओरड करायला लागला आणि दुचाकीची चावी काढून निघून गेला. (प्रतिनिधी)

Web Title: Assistant Faujdar