मालमत्तेची माहिती आता मिळणार ‘एसएमएस’वर!
By Admin | Updated: May 24, 2016 03:46 IST2016-05-24T03:46:50+5:302016-05-24T03:46:50+5:30
जमिनींसह सदनिकांचे वाढते गैरव्यवहार रोखण्यासाठी राज्यशासनाचा नोंदणी व मुद्रांक विभाग पुढे सरसावला आहे. खरेदी-विक्रीच्या कागदपत्रांचे डिजिटलायझेशन करण्यात आले असून ते थेट मोबाईलशी

मालमत्तेची माहिती आता मिळणार ‘एसएमएस’वर!
पुणे : जमिनींसह सदनिकांचे वाढते गैरव्यवहार रोखण्यासाठी राज्यशासनाचा नोंदणी व मुद्रांक विभाग पुढे सरसावला आहे. खरेदी-विक्रीच्या कागदपत्रांचे डिजिटलायझेशन करण्यात आले असून ते थेट मोबाईलशी जोडले आहे. त्यामुळे ज्या मालमत्तेची खरेदी-विक्री करणार त्याच्या कागदपत्रांवरील नोंदणी क्रमांक विभागाच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस केल्यास ती जमीन कोणाच्या नावावर आहे, त्या कागदपत्राची नोंद कधी झाली आहे, याची माहिती लगेचच संबंधिताला मिळणार आहे. यामुळे गैरव्यवहारांना आळा बसण्यास मोठी मदत होईल.
राज्यात जमिनींसह सदनिकांच्या गैरव्यवहारात मोठी वाढ झाली आहे. मालमत्तेची खरेदी-विक्री करणारे दलाल अनेकदा बनावट कागदपत्रे दाखवितात. परंतु ते तपासण्याची सोपी यंत्रणाच उपलब्ध नसल्याने त्याचा फटका खरेदीदारांना बसत होता. बनावट कागदपत्रांवर विश्वास ठेऊन मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना पुढे ती मालमत्ता अनेकांना विकल्याचे निदर्शनास येते. मात्र त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. नोंदणी व मुद्रांक विभागाने जमिनी, सदनिकांच्या विक्रीच्या कागदपत्रांचे डिजिटलायझेशन करण्यास सुरूवात केली आणि ते सर्व्हरवर ठेवून विभागाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन देण्यास सुरूवात केली. ‘ई सर्च’च्या माध्यमातून खरेदी करणाऱ्या व्यक्तीला तो जी मालमत्ता घेणार आहे ती नेमकी कोणाच्या नावावर आहे हे त्या मालमत्तेचा नोंदणी क्रमांक टाकून समजू लागले. आता एसएमएसवर देखील माहिती दिली जाणार आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाने या सेवेसाठी ९७६६८९९८९९ हा क्रमांक दिला आहे.
वाढलेले मालमत्तेचे गैरव्यवहार रोखण्यासाठी मुद्रांक शुल्क विभागाने एसएमएस सेवा सुरू केली आहे. विभागाच्या संकेतस्थळावर कागदपत्रे आहेत. मात्र आता त्याची माहिती एसएमएसवरुनही मिळणारआहे. खरेदीदाराने कागदपत्रांवरील नोंदणी क्रमांक विभागाने दिलेल्या (९७६६८९९८९९) क्रमांकावर एसएमएस केल्यावर त्यांना लगेचच ती मालमत्ता कोणाच्या नावे आहे हे कळणार आहे.
- एन. रामास्वामी, महानिरीक्षक-नोंदणी व मुद्रांक विभाग