शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
आजचा अग्रलेख: हसीना यांना पुन्हा सांभाळा !
5
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
6
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
7
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
8
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
9
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
10
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
11
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
13
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
14
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
15
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
17
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
18
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
19
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
20
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता जप्तीचा आकडा २०१९ पेक्षा आताच दुप्पट; गुन्ह्यांच्या वाढत्या संख्येबद्दल आयोगाला चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 11:31 IST

गेल्यावेळी पूर्ण निवडणूक काळात १२२ कोटी ६७ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती, हा आकडा यावेळी आताच ३४५ कोटींवर गेला आहे.

मुंबई : २०१९च्या निवडणुकीत आचारसंहिता लागू होणे ते मतदानापर्यंतच्या काळात जेवढ्या रकमेची मालमत्ता पोलिस व इतर यंत्रणांनी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये जप्त केली होती तो आकडा  यावेळी मतदानाला २२ दिवस शिल्लक असताना दुपटीहून अधिक झाला. 

गेल्यावेळी पूर्ण निवडणूक काळात १२२ कोटी ६७ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती, हा आकडा यावेळी आताच ३४५ कोटींवर गेला आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या महाराष्ट्र आणि झारखंडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यात ही माहिती देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीला दोन्ही राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य सचिव, पोलिस महासंचालक उपस्थित होते. या बैठकीला राज्याच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. 

राजीव कुमार यांनी या बैठकीत महाराष्ट्रातील वाढत्या राजकीय हिंसक घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. निवडणुकीचे वातावरण बिघडविणाऱ्यांविरूद्ध कठोर पावले उचला, असे आदेश राजीव कुमार यांनी महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दिले. कोणाचीही गय करू नका, असे त्यांनी बजावले.

कुठून येतोय पैसा?निवडणुकीतील पैसा, दारूचा गैरवापर, सोने - चांदीसह मौल्यवान वस्तूंचे होणारे वाटप असे प्रकार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये  आचारसंहिता लागू झाल्यापासून ३४५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील १७५ कोटींच्या मालमत्ता आहेत. निवडणूक होत असलेल्या राज्यांना लागून असलेल्या राज्यांमधून बरेचदा मोठ्या प्रमाणात निवडणुकीत वापरण्यासाठी पैसा येत असतो. तसेच अवैध दारूही मोठ्या प्रमाणात आणली जाते. सीमावर्ती नाक्यांवर पोलिसांची गस्त वाढवा, असेही आदेश राजीव कुमार यांनी दिले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग