शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणावरून विधिमंडळात गदारोळ, तीनवेळा विधानसभा तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 04:58 IST

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाच्या विषयावरून प्रचंड गदारोळ झाला.

नागपूर : विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाच्या विषयावरून प्रचंड गदारोळ झाला. विधानसभा तीनवेळा तहकूब झाली. विरोधी बाकावरील सदस्य आक्रमक होत वेलमध्ये उतरले. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात सर्व पक्षाच्या गटनेत्यांची बैठक झाली. शेवटी १६ टक्के जागा मराठा समाजासाठी राखीव ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आणि हा गोंधळ शांत झाला.मराठा आरक्षणावरून परळीला सगळे तरुण एकत्र आले आहेत. लेखी आश्वासन मिळेपर्यंत हटणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. आरक्षणावरून सरकार वेळकाढूपणा करत आहेत. सत्तेत येण्यापूर्वी आरक्षण देण्याची घोषणा केली होती आता मराठा समाजाच्या भावनेशी सरकार खेळत आहे असे आक्षेप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतले. तर आषाढी दिवशी पंढरपुरात आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे. लाखाचे मोर्चे निघाले तरी सरकार निर्णय घेत नाही. मराठा समाजासाठी सहा निर्णय घेतले मात्र त्याचा काही फायदा नाही. शांततेत मोर्चे काढले, पण आता तरुण चिडले आहेत असे राष्टÑवादीचे नेते अजित पवार म्हणाले.मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचे समर्थन आहे. मात्र मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचे काम काँग्रेस व राष्ट्रवादीने केले असा आरोप भाजपाचे नेते आ. आशिष शेलार यांनी केला. शिवसेनेचे आ. चंद्रदीप नरके यांनीदेखील जोरदार आक्षेप घेत सरकारने न्यायालयात आपली बाजू मांडावी अशी मागणी केली.विधानपरिषदेत बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी परळीत ३० तासांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे, बीड जिल्ह्यात आणि राज्याच्या तालुक्या-तालुक्यात हे आंदोलन सुरू होत आहे, आंदोलनकर्ते हटायला तयार नाही. भाजपा सरकारने कूटनीती तंत्राचा वापर करून गुजरातमधील पटेलांचे, हरियाणातील जाटांचे आरक्षण संपवून टाकले, तोच प्रयोग मराठा आरक्षणाबाबत होतो. मागासवर्ग आयोगाचे काम कुठपर्यंत आले, किती दिवसात पूर्ण होणार आहे अशी विचारणा न्यायालयाला करावी लागत आहे याचा अर्थ सरकार वेळकाढूपणा करत आहे असेही मुंडे यावेळी म्हणाले. गुरुवारी विधानपरिषदेमध्ये यावर पुन्हा एकदा स्थगन प्रस्ताव दिला गेला. आम्ही बुधवारी मागणी केली होती की, बेरोजगारांची जी महाभरती केली जाणार आहे त्यामध्ये ७२ हजार भरती केली जाणार आहे. त्यामध्ये मराठा समाजाच्या १६ टक्के जागा बाजूला ठेवा आणि त्यानंतर भरती करा. त्याबाबतचे सकारात्मक उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र यामध्ये मोठ्या शंका निर्माण होत आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८