मुलाच्या मदतीला धावलेल्या महिलेची भीषण हत्या

By Admin | Updated: May 23, 2016 13:26 IST2016-05-23T13:26:03+5:302016-05-23T13:26:32+5:30

मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून समजवायला धावलेल्या महिलेच्या छातीवर आणि गळळ्यावर चाकूचे घाव घालून शेजारच्या तरुणाने तिची भीषण हत्या केली.

The assassination of a woman who was killed in the child's help | मुलाच्या मदतीला धावलेल्या महिलेची भीषण हत्या

मुलाच्या मदतीला धावलेल्या महिलेची भीषण हत्या

>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २३ - मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून समजवायला धावलेल्या महिलेच्या छातीवर आणि गळळ्यावर चाकूचे घाव घालून शेजारच्या तरुणाने तिची भीषण हत्या केली. 
रविवारी रात्री १०.४५ वाजता यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली. ज्योती पप्पूजी शिंदे (वय ६५) असे मृत महिलेचे नाव असून, आरोपीचे नाव महेंद्र महादेव बिनेकर (वय ३३) आहे. आरोपीच्या हल्ल्यात मृत महिलेचा मुलगा कपिल (वय २६) हाही जबर जखमी झाला. माहिती कळताच यशोधरानगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला अटक केली. 

Web Title: The assassination of a woman who was killed in the child's help