आसामचे मुख्यमंत्री गोगोई राजीनामा देणार

By Admin | Updated: May 18, 2014 00:44 IST2014-05-18T00:44:24+5:302014-05-18T00:44:24+5:30

आपण एक आठवडय़ाच्या आत आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी जाहीर केले आहे.

Assam Chief Minister Gogoi resigns | आसामचे मुख्यमंत्री गोगोई राजीनामा देणार

आसामचे मुख्यमंत्री गोगोई राजीनामा देणार

>गुवाहाटी : आसाममधील लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारत आपण एक आठवडय़ाच्या आत आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी जाहीर केले आहे.
मी राजीनामा देणार आहे, परंतु राजकारण मात्र सोडणार नाही आणि पक्षाला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी काम करीत राहणार असल्याचेही गोगोई म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठविणार असल्याचे गोगोई यांनी शुक्रवारी सांगितले होते. जेव्हा तुम्ही तीनवेळा मुख्यमंत्री म्हणून विजय प्राप्त करता तेव्हा तुमच्यात थोडा तरी अहंकार आणि आत्मसंतुष्टता येतेच. माङयाबाबत आणि माङया पक्षाबाबतही असाच काहीसा प्रकार घडला आहे. आम्हाला कुणीही पराभूत करू शकत नाही, असे आम्हाला वाटत होते. आम्ही याआधीही पराभवाची चव चाखली आहे याचा आम्हाला विसर पडला होता, असे गोगोई म्हणाले. 

Web Title: Assam Chief Minister Gogoi resigns