मदत करणाऱ्याचाच अपघातग्रस्तांनी केला खून
By Admin | Updated: April 20, 2016 16:10 IST2016-04-20T16:10:41+5:302016-04-20T16:10:41+5:30
खडकीमध्ये गाडी घसरुन पडलेल्या तिघाजणांना मदत करण्यासाठी गेलेल्या युवकाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

मदत करणाऱ्याचाच अपघातग्रस्तांनी केला खून
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 20 - खडकीमध्ये गाडी घसरुन पडलेल्या तिघाजणांना मदत करण्यासाठी गेलेल्या युवकाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना आज पहाटे दोनच्या सुमारास घडली आहे.
असीम मोहम्मद शहा ( वय - ३० वर्षे) असे मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी इसाक हकीम शहा, विजय वसंत शिंदे आणि दाऊद दिलवार शेख (सर्वांचे वय साधारण २२ ते २५ वर्षे) या तिघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खडकी येथे तीन जणांचा घसरुन अपघात झाला, त्यानंतर या अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी गेलेल्या युवकाला वरील तिघांनी मारहाण केली. यात असीम मोहम्मद शहा याचा मृत्यू झाला. दरम्यान मयत असीम आणि आरोपी इसाक हे काका पुतण्या असून आरोपी आणि मयत तरुण यांच्या यापूर्वी काही वाद झाले होते का याचा तपास पोलीस करत आहेत. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी हे सर्वजण दारूच्या नशेत होते.