शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : ७ मतदारसंघांत नवखे इच्छुक; तीन प्रस्थापित उमेदवार राहणार कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 04:38 IST

शिवसेनेने जिल्ह्यातील सर्व ११ जागांसाठी इच्छूकांच्या मुलाखती घेतल्या

जळगाव : शिवसेनेने जिल्ह्यातील सर्व ११ जागांसाठी इच्छूकांच्या मुलाखती घेतल्या असून, यामध्ये जळगाव ग्रामीण, एरंडोल, मुक्ताईनगर व पाचोऱ्यात प्रस्थापितांनी उमेदवारीवर दावा केला असला तरी उर्वरीत आठ मतदारसंघासाठी सेनेकडून इच्छूकांनी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे २०१४ मध्ये शिवसेनेकडून उभ्या असलेल्या उमेदवारांनी यंदा मुलाखती दिल्या नसून, त्यांच्याऐवजी नवख्या उमेदवारांनी मुलाखती दिल्याचे दिसून येत आहे. चाळीगावमध्ये शिवसेनेकडून तिघे इच्छुक आहेत.पारोळा-एरंडोलसाठी माजी आमदार चिमणराव पाटील , जळगाव ग्रामीणमधून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, पाचोºयातून विद्यमान आमदार किशोर पाटील यांनी मुलाखत दिली. तर मुक्ताईनगर मतदारसंघात देखील जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनीच मुलाखत दिली आहे. २०१४ मध्ये देखील चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांना जोरदार टक्कर दिली होती. त्यामुळे यंदा येथे इच्छुकांची स्पर्धा नाही. रावेर, अमळनेर, जामनेर, भुसावळमध्ये मात्र स्पर्धा आहे.>चोपडा व जळगाव शहरसाठी नवख्याला संधीघरकुल प्रकरणी माजी आमदार सुरेशदादा जैन व चोपड्याचे विद्यमान आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांना शिक्षा झाल्यामुळे या दोन्ही जागांवर सेनेकडून इतर उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. चोपडा शहरासाठी विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणे व त्यांचे बंधू श्यामकांत सोनवणे यांनी देखील मुलाखती दिल्या आहेत. तर जळगाव शहर मतदारसंघ युतीच्या काळात शिवसेनेकडेच राहिला आहे. २०१४ मध्ये युती तुटल्यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपाचे सुरेश भोळे विजयी झाले होते. दरम्यान, या जागेसाठी दोन्हीही पक्ष आग्रही आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019