प्रश्न मांडून बदल होत नाही, उत्तरे शोधावी लागतात - लोकमत महाचर्चा
By Admin | Updated: September 11, 2016 13:41 IST2016-09-11T12:56:13+5:302016-09-11T13:41:04+5:30
केवळ प्रश्न मांडून परिवर्तन होत नाही, तर उत्तरे शोधावी लागतात. जगाचे शहरीकरण ही स्वाभाविक प्रक्रिया आहे.

प्रश्न मांडून बदल होत नाही, उत्तरे शोधावी लागतात - लोकमत महाचर्चा
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ११ - केवळ प्रश्न मांडून परिवर्तन होत नाही, तर उत्तरे शोधावी लागतात. जगाचे शहरीकरण ही स्वाभाविक प्रक्रिया असून, अगोदर शहरीकरणाकडे नकारात्मक नजरेने पाहिले जायचे. शहरीकरणाचे व्यवस्थापन आवश्यक असून, सर्वसमावेशक प्रभावशाली धोरण हवे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी लोकमत महाचर्चेमध्ये बोलताना सांगितले.
त्यांच्या हस्ते या महाचर्चेचे उदघाटन झाले. यावेळी लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन विजय दर्डा यांनी शासनाकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत .स्मार्ट सिटीची चर्चा होत असताना शाश्वत विकासावर भर द्यावा असे सांगितले.
या चर्चासत्रात नागपूरच्या विकास , समस्या, अपेक्षा व नियोजन यावर चर्चा होणार असून, तज्ज्ञ यामध्ये सहभागी होणार आहेत.