आशिया चषक आला; पण हातची नोकरी गेली!

By Admin | Updated: April 8, 2015 02:45 IST2015-04-08T02:45:14+5:302015-04-08T02:45:14+5:30

एकीकडे कोट्यधीश झालेल्या खेळाडूंचा आयपीएलचा महासंग्राम सुरू होत असताना अपंगांच्या टीम इंडियात चमकदार कामगिरी करीत आशिया चषक पटकावून

Asia Cup; But the job was lost! | आशिया चषक आला; पण हातची नोकरी गेली!

आशिया चषक आला; पण हातची नोकरी गेली!

सुनील घरत, पारोळ (जि. पालघर)
एकीकडे कोट्यधीश झालेल्या खेळाडूंचा आयपीएलचा महासंग्राम सुरू होत असताना अपंगांच्या टीम इंडियात चमकदार कामगिरी करीत आशिया चषक पटकावून देणा-या एका खेळाडूला पोटापाण्यासाठी सुरू असलेली नोकरी गमवावी लागली असल्याची घटना पालघर जिल्ह्यात उघडकीस आली आहे.
दिल्लीत नुकत्याच झालेल्या अपंगांच्या २० षटकांच्या आशिया क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य ठरला. त्यात नालासोपारा येथील अपंग खेळाडू कैलास घाणेकर याने महत्त्वाची भूमिका बजावली. फलंदाजी आणि गोलंदाजीतही त्याने चुणूक दाखवली. अपंगांच्या क्रिकेट संघात महाराष्ट्राकडून प्रतिनिधित्व करणारा तो एकमेव खेळाडू होता. जन्मजात पोलिओ असलेल्या कैलासने भारतीय संघात उत्तम कामगिरी बजावत आशिया चषक जिंकून भारताची शान वाढवली. मात्र स्पर्धेवरून परतल्यानंतर त्याने त्याची नोकरी गमावलेली होती.

Web Title: Asia Cup; But the job was lost!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.