अश्विन नाईकला २४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

By Admin | Updated: December 21, 2015 14:04 IST2015-12-21T14:04:09+5:302015-12-21T14:04:09+5:30

दादरमधल्या बांधकाम व्यावसायिकाकडून १५ लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणात अटक करण्यात आलेला गॅंगस्टर अश्विन नाईकला सत्र न्यायालयाने सोमवारी २४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Ashwin Naik's police custody till Dec 24 | अश्विन नाईकला २४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

अश्विन नाईकला २४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २१ - दादरमधल्या बांधकाम व्यावसायिकाकडून १५ लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणात अटक करण्यात आलेला गॅंगस्टर अश्विन नाईकला सत्र न्यायालयाने सोमवारी २४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. नाईकसह त्याच्या चार साथीदारांनाही पोलिस कोठडीत पाठवण्यात आले.  

रविवारी दादर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाकडून १५ लाखांची खंडणी घेत असताना, गँगस्टर अश्विन नाईकला सापळा रचून अटक केली. नाईकने यापूर्वी याच बांधकाम व्यावसायिकाच्या भागीदाराकडून तब्बल २५ लाख रुपये उकळले होते.
दादर परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाचे पार्टनरशिपमध्ये इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ९ डिसेंबर रोजी नाईक आणि त्याच्या साथीदारांनी या बांधकाम व्यावसायिकाच्या भागीदाराचे रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अपहरण केले. अपहरणानंतर सुभाषनगर येथे अपहरण केलेल्यास जीवे ठार मारण्याची धमकी नाईकने दिली, तसेच ५० लाखांची खंडणी आणि नव्या इमारतीत ६ हजार स्वेअर फूट जागा देण्याची मागणी नाईकने केली. 
त्यानुसार घाबरलेल्या या व्यक्तीने २५ लाख रुपये नाईकला दिले होते. त्यानंतर उर्वरित रक्कम देण्यासाठी २० तारखेपर्यंतची वेळ त्याने नाईककडे मागितली होती.  संबंधित व्यावसायिकाने नाईकच्या भीतीला न जुमानता, दादर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. 
एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन आणि आता बिल्डर व्यवसायात असणारा अश्विन नाईक हा चौथ्यांदा खंडणीच्या गुन्ह्यात गजाआड झाला आहे. एन.एम. जोशी परिसरात राहण्यास असलेला नाईक २००९ मध्ये सर्व गुन्ह्यांतून मुक्त झाला होता. अश्विन नाईकवर १९९४ साली त्याच्यावर गोळीबार झाला होता. त्यात त्याने दोन्ही पाय गमावले. तेव्हापासून आजपर्यंत नाईक व्हीलचेयर वरच आहे.

Web Title: Ashwin Naik's police custody till Dec 24