अशोक सराफ यांना नाट्य परिषदेचा पुरस्कार

By Admin | Updated: March 5, 2016 03:52 IST2016-03-05T03:52:13+5:302016-03-05T03:52:13+5:30

नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने दर दोन वर्षांनी दिला जाणारा वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार अभिनेते अशोक सराफ यांना तर नाट्यलेखक जयंत पवार यांना वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार जाहीर झाला आहे.

Ashok Saraf won the Natya Parishad Award | अशोक सराफ यांना नाट्य परिषदेचा पुरस्कार

अशोक सराफ यांना नाट्य परिषदेचा पुरस्कार

नाशिक : नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने दर दोन वर्षांनी दिला जाणारा वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार अभिनेते अशोक सराफ यांना तर नाट्यलेखक जयंत पवार यांना वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार जाहीर झाला आहे.
ज्येष्ठ लेखिका सुषमा अभ्यंकर यांना बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. २७ मे रोजी नाशिकमध्ये पुरस्कार वितरण होईल. कानेटकर व शिरवाडकर पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र, तर सावंत पुरस्काराचे स्वरूप ५ हजार रुपये
रोख व स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे आहे.
पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकरांपासून मधुकर तोरडमल हे शिरवाडकर लेखन पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. तर डॉ. श्रीराम लागूंपासून प्रशांत दामले हे कानेटकर रंगकर्मी पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Ashok Saraf won the Natya Parishad Award