खरात यांचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे. इंटेलिजन्सच्या सहाय्याने आम्हीच त्याचा भांडाफोड केला आहे आणि आम्हाला याची कल्पना होती की, लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे महिला एकदम पुढे येत नाहीत, म्हणून अशा प्रकारचे जे काही पीडित आहेत, त्यांना धीर देऊन, त्यांच्या घरच्यांना धीर देऊन, त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये काही प्रमाणात महिला आता प्रतिसादही देत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.
फडणवीस म्हणाले, "या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होत आहे. यासंदर्भात मी डीजींना सांगितले आहे की, त्यांनी याचे मॉनिटरिंग करावे. याच्यामध्ये एसआयटी तयार करण्यात आली आहे. नाशिक सीपी आणि एसआयटी मिळून हे काम पूर्ण करत आहेत. मला असे वाटते की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कुणालाही सोडले जाणार नाही. आता याला रंग देण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे. कुणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चित आणून द्यावा. त्याच्यावरही कारवाई होईल. पण विनाकारण प्रत्येक गोष्टीला केवळ राजकीय रंग... आता अनेक लोकं जायचे. विरोधी पक्षाचे कोण कोण गेलेत त्यांचे मी पुरावे देऊ शकतो? सर्वांत जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे, पण ते पोलिसांकडे आहेत. ते पोलिसांचे काम आहे, ते माझे काम नाही."
फडणवीस पुढे म्हणाले, "खरातांना भेटणाऱ्यांपैकी कोणाचेही सहभाग आढळला तर, कारवाई होईल. मात्र, कोणी भेटलं, यावरून आपण कारवाई करायला लागलो, तर मग तुम्हालाही माहितच आहे की, कोण-कोण, काय-काय, कसं-कसं करायचं. त्यांना अऊट ऑफ टर्न जाऊन पाणी कुणी दिलं? कसं दिलं? चाळीस किलोमिटर पाण्याची लाइन कशी दिली? हे सगळं तुम्ही काल दाखवलं. यामुळे मला असं वाटतं की यामध्ये राजकारण करू नये. हा महिलांच्या सन्मानाचा प्रश्न आहे, अशा प्रकारे आपल्या तथाकथित शक्तींचा उपयोग करून महिलांना भरीस पाडणं यापेक्षा वाईट गुन्हा असू शकत नाही. काही झालं तरी त्यांना त्याची शिक्षा ही भोगावीच लागेल. सरकार आणि पोलीस याकरता जे करावं लागेल ते करायला तयार आहे."
"कोणाचाही कुणासोबतही फटो असू शकतो. पण ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवून चाळीस किलोमिटर दुरून त्यांना पाणी दिलं, त्यांना काय शिक्षा द्यायची? आणि मंत्र्यांबद्दल बोलणारे त्यांच्याबद्दल का चूक आहे? तेथे तोंडाला कुलूप का लागतंय? सिलेक्टिव्ह का बोलत आहेत? काहींना केवळ राजकारण करायचे आहे. आम्हाला राजकारणात रुची नाही. आम्हाला महिलांचा सन्मान महत्वाचा वाटतो. ज्या महिलांच्या सोबत त्यांनी दुर्व्यवहार केलाय त्या प्रत्येक महिलेला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. तसेच जेथे आर्थिक व्यवहार दिसून येतील, त्यासंदर्भातही चौकशी केली जाईल," असेही फडणवीस यावेळी म्हणाले."
Web Summary : Fadnavis stated the Kharat case is serious and exposed by them with intelligence. An SIT is formed, no one will be spared. He urged providing evidence instead of politicizing, prioritizing women's respect and justice for victims, probing financial dealings.
Web Summary : फडणवीस ने कहा खरात मामला गंभीर है, जिसे उन्होंने खुफिया जानकारी से उजागर किया। एसआईटी गठित, कोई नहीं बचेगा। उन्होंने राजनीति करने के बजाय सबूत देने का आग्रह किया, महिलाओं के सम्मान और पीड़ितों को न्याय प्राथमिकता, वित्तीय सौदों की जांच होगी।