अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणी सध्या अटकेत असलेला भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्या कुकृत्यांचा पाढा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात मांडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अशोक खरातवर कठोर कारवाईचे संकेतही दिले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावेळी उद्धवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी अशोक खरातसोबत संबंध आणि फोटो असलेल्या अधिकारी, नेतेमंडळींचीही चौकशी होणार का असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अध्यक्ष महोदय, या प्रकरणामध्ये ज्या ज्या व्यक्तीविरोधात पुरावा मिळेल, त्या प्रत्येकाची आम्ही चौकशी करू. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आपण सगळे राजकारणात आहोत. त्यामुळे कुणाचाही फोटो कुणासोबतही येतो हे आपण पाहिलेलं आहे. नुसता फोटो कुणासोबतही आहे, म्हणून एखाद्याला आरोपी करता येणार नाही, पण आता आपण डिलिटेड डेटाही काढत आहोत. त्यामुळे डिलिटेड डेटामध्ये कुणाचा संपर्क होता का? कुणी व्यवहार केला आहे का, कुणी मेसेज केले आहेत का? या गोष्टीत जो कुणी असेल, त्याची चौकशी केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
फडणवीस पुढे म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या एसआयटीचं प्रमुख आपण जाणीवपूर्वक एका महिला अधिकाऱ्याला केलं आहे. यातील संवेदनशीलता लक्षात घेऊन, एका महिला अधिकाऱ्याला आपण एसआयटीचं प्रमुख केलं आहे. तसेच त्यांचा ट्रॅक रेकॉर्डही चांगला आहे. त्यामुळे या प्रकरणात आपण कुणालाही मागे घालणार नाही. खरात याला कुणी थेट मदत केली असेल, कुणी अप्रत्यक्ष मदत केली असेल, तरी त्याला आपण धडा शिकवू, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
Web Summary : CM Fadnavis vows investigation into Ashok Kharat's accomplices. Evidence, not just photos, will determine culpability. Deleted data, messages will be scrutinized. A female officer leads the SIT.
Web Summary : सीएम फडणवीस ने अशोक खरात के साथियों की जांच का वादा किया। सिर्फ तस्वीरें नहीं, सबूतों से तय होगी जवाबदेही। डिलीट किया गया डेटा, मैसेज की जांच होगी। महिला अधिकारी एसआईटी का नेतृत्व करेंगी।