शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Ashok Kharat Case: अशोक खरातच्या अटकेनंतर राजकीय भूकंप; चाकणकरांच्या राजीनाम्यावर सुनील तटकरे काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 18:24 IST

Sunil Tatkare On Rupali Chakankar: नाशिकमधील स्वयंघोषित महाराज अशोक खरात याच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

नाशिकमधील स्वयंघोषित महाराज अशोक खरात याच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. खरातवर बलात्काराचे गंभीर आरोप झाले असून, त्याच्यासोबतचे राजकीय नेत्यांचे फोटो आता चर्चेचा विषय ठरत आहेत. विशेषतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या खरातची पाद्यपूजा करतानाचे फोटो व्हायरल झाल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे.

भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली नाशिक पोलिसांनी अशोक खरातला अटक केली आहे. अटकेनंतर खरातचे अनेक बड्या नेत्यांसोबतचे संबंध उघड झाले आहेत. मात्र, महिलांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या रुपाली चाकणकर या अशोक खरात यांच्या चरणी लीन झाल्याचे फोटो समोर आल्याने नैतिकतेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.

या सर्व वादावर पत्रकारांनी सुनील तटकरे यांना गाठले असता, त्यांनी या विषयावर सविस्तर भाष्य करणे टाळले. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीबद्दल विचारले असता तटकरे म्हणाले की, "मी योग्य वेळी त्यावर बोलेन. मला बोलण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. त्यामुळे मला ज्यावेळी जेवढे बोलायचे आहे, तेवढेच मी बोलेन. तसेच मला जेव्हा त्या विषयावर बोलायचे असेल, तेव्हा मी नक्कीच बोलेन."

सुनील तटकरे यांनी 'योग्य वेळी बोलेन' असे म्हणून सध्या तरी या वादापासून अंतर राखल्याचे दिसत आहे. मात्र, एकीकडे खरातचे कारनामे समोर येत असताना आणि दुसरीकडे चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठत असताना, पक्ष यावर काय अधिकृत भूमिका घेतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Political Earthquake After Ashok Kharat's Arrest; Sunil Tatkare on Chakanakar's Resignation.

Web Summary : Ashok Kharat's arrest for alleged rape sparked political turmoil. Photos of Rupali Chakanakar with Kharat fueled opposition calls for her resignation. Sunil Tatkare remained noncommittal, promising to speak at the right time.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातRupali Chakankarरुपाली चाकणकरsunil tatkareसुनील तटकरेPoliticsराजकारण