अशोक जाधवला 12 दिवसांची कोठडी

By Admin | Updated: December 9, 2014 02:12 IST2014-12-09T02:12:58+5:302014-12-09T02:12:58+5:30

जवखेडे खालसा येथील जाधव कुटुंबातील तिघांच्या हत्या प्रकरणात रविवारी मध्यरात्री पोलिसांनी अशोक दिलीप जाधव याला अटक केली.

Ashok Jadhav for 12 days | अशोक जाधवला 12 दिवसांची कोठडी

अशोक जाधवला 12 दिवसांची कोठडी

>पाथर्डी (जि. अहमदनगर) : जवखेडे खालसा येथील जाधव कुटुंबातील तिघांच्या हत्या प्रकरणात रविवारी मध्यरात्री पोलिसांनी अशोक दिलीप जाधव याला अटक केली. यापूर्वी अटक केलेला व सध्या पोलीस कोठडीत असलेला प्रशांत जाधव याचा अशोक हा सख्खा भाऊ आहे. सोमवारी न्यायालयाने त्याला 12 दिवसांची कोठडी सुनावली आह़े
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील संजय जाधव, त्याची पत्नी जयश्री व मुलगा सुनील यांची 2क् आक्टोबरच्या मध्यरात्री धारदार शस्त्रने हत्या केली होती़ या प्रकरणात पोलिसांनी तब्बल 43 दिवसांनंतर दिलीप जाधव याला अटक केली़ सध्या तो पोलीस कोठडीत आहे.
रविवारी मध्यरात्री पोलिसांनी त्याचाच भाऊ अशोक याला अटक केली़ सोमवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायाधीश व्ही. एफ. चौगुले यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अशोक दिलीप जाधव यास 12 दिवसांची म्हणजेच 19 डिसेंबर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Ashok Jadhav for 12 days