शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

...अन् रात्री २ वाजता कॉल; २४ तासांत पक्षप्रवेश; अशोक चव्हाण भाजपात कसे आले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 05:21 IST

राज्य, माझा जिल्हा यांच्या विकासासाठी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे भाजपमध्ये गेलो आहे असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं.

मुंबई - काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर २४ तासांच्या आतच ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आणखी काही नेते आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला. 

प्रदेश भाजप कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात चव्हाण यांनी भाजप सदस्यत्वाचा फॉर्म भरला. चव्हाण समर्थकांनी गर्दी केली होती.  मंत्री गिरीश महाजन, मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार, खा. प्रताप पाटील-चिखलीकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. माजी आमदार अमर राजूरकर यांनीही यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. 

...अन् रात्री २ वाजता कॉलअशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, हे जवळपास निश्चित झाले आहे. सूत्रांनी सांगितले की, चव्हाण यांनी मंगळवारीच भाजप प्रवेश घ्यावा, असे सोमवारी मध्यरात्रीनंतर २ वाजता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिल्लीहून कळविण्यात आले. बावनकुळे यांनी लगेच चव्हाण यांना कॉल करून ही माहिती दिली.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष...आशिष शेलार यांचा उल्लेख अशोक चव्हाण यांनी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असा करताच हशा पिकला. 

मी बिनशर्त भाजपमध्ये गेलो आहे. राज्य, माझा जिल्हा यांच्या विकासासाठी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे भाजपमध्ये गेलो आहे. पक्षादेश, फडणवीस सांगतील त्याप्रमाणे मी काम करीन.- अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री

अशोकरावांचा दीर्घ अनुभव लक्षात घेऊन त्यांना अत्यंत सन्मानाने पक्षात स्थान दिले जाईल. ज्येष्ठ नेते काँग्रेसला सांभाळता येत नाहीत. काँग्रेस दिशाहीन झाली असून, त्यांनी आत्मचिंतन करावे. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस