शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अशोक चव्हाणांच्या रूपाने काँग्रेसला मराठवाड्यात बळकटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 12:28 IST

अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र विधिमंडळात विविध खात्याचे मंत्रीपद भूषवत दोनवेळा मुख्यमंत्रीपदाच्या रूपाने राज्याचे नेतृत्वही केले आहे.

मुंबई: माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी मुंबई येथे कॅबिनेट मंत्रिपदाची सातव्यावेळी शपथ घेतली. हे वृत्त समजताच नांदेड शहरासह जिल्ह्यातील विविध भागात काँग्रेससह महाआघाडीच्या कार्यकत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला. अशोकराव चव्हाण यांच्या मंत्रिपदामुळे नांदेडसह मराठ्याङ्यातील काँग्रेसचा गड आता आणखीनच भक्कम होणार आहे. दरम्यान, चव्हाण यांना कोणते खाते मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र विधिमंडळात विविध खात्याचे मंत्रीपद भूषवत दोनवेळा मुख्यमंत्रीपदाच्या रूपाने राज्याचे नेतृत्वही केले आहे. या काळात त्यांनी मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला वाढवण्याचे काम केले. विशेष म्हणजे विरोधी पक्षात असताना सुद्धा नांदेड जिल्ह्यात काँग्रेसने बहुतांश निवडणुकांमध्ये वर्चस्व राखल्याचे पाहायला मिळाले होते.

२०१४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर काँग्रेसला गळती लागली होती. या काळात स्थानिक संस्था सुद्धा भाजप-शिवसेनेच्या ताब्यात जात होत्या. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना सांभाळने काँग्रेससमोर मोठे आव्हान होते. मराठवाड्यात सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती. अशात लातूरमध्ये देशमुख कुटुंब आणि नांदेडला चव्हाण यांनी काँग्रेसला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र मराठवाड्यात इतर ठिकाणी काँग्रेसला घरघर लागली असल्याचे पाहायला मिळाले.

अशोक चव्हाण यांचा राजकीय अनुभव पाहता आता मराठवाड्यात काँग्रेसला चांगले दिवस येणार असल्याचे बोलले जात आहे. चव्हाण यांना मंत्रीपद मिळाल्याने मराठवाड्यात काँग्रेस दबदबा वाढणार असल्याची चर्चा आहे. तसेच काँग्रेसमधील तळागाळातील कार्यकर्त्यांनाही मोठा आधार मिळणार आहे.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाली. ही नांदेडसह मराठवाड्यासाठी सुवर्णसंधी आहे. मागील पाच वर्षात भाजपा नेतृत्वाखालील सरकारने नांदेडसह मराठवाड्याच्या विकासाला खीळ बसविण्याचे काम केले. विकास कामाऐवजी केवळ थापा मारण्यात धन्यता मानल्याने राज्यात महाआघाडीचे सरकार आले. मराठवाड्यातील एक ज्येष्ठ प्रतिनिधी म्हणून मराठवाड्याचे  प्रश्न सोडविण्यासाठी तसेच न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. - अशोक चव्हाण ( कॅबिनेट मंत्री )