‘आशिष शेलारच बिल्डरमाफिया !’
By Admin | Updated: June 11, 2016 04:21 IST2016-06-11T04:21:50+5:302016-06-11T04:21:50+5:30
मुंबई भाजपाध्यक्ष स्वत:च बिल्डरमाफिया असल्याचा आरोप करीत शिवसेनेने शुक्रवारी गिरगावात निदर्शने केली.

‘आशिष शेलारच बिल्डरमाफिया !’
शिवसेनेवर बिल्डरधार्जिणे असल्याचा आरोप करणारे मुंबई भाजपाध्यक्ष स्वत:च बिल्डरमाफिया असल्याचा आरोप करीत शिवसेनेने शुक्रवारी गिरगावात निदर्शने केली. मेट्रो-३ प्रकल्पामुळे कुलाबा, गिरगावातील मराठी माणूस विस्थापित होणार असल्याचा दावा करीत शिवसेनेने मुंबई महापालिकेत या प्रकल्पास विरोध केला होता. शिवसेनेने काँग्रेसच्या साथीने विरोध केला. शिवसेनेच्या या भूमिकेवर शेलार यांनी जोरदार टीका केली होती.