शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राज्याची निर्मिती करा, गळ्यातील हड्डी निसटल्याने सरकारने संधीचे सोने करावे - आशिष देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 15:05 IST

विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ७ जानेवारीपासून ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. या यात्रेच्या निमित्ताने बेरोजगार, शेतकरी, शेतमजुर आदींशी संवाद साधला जात आहे.

वर्धा : विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ७ जानेवारीपासून ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. या यात्रेच्या निमित्ताने बेरोजगार, शेतकरी, शेतमजुर आदींशी संवाद साधला जात आहे. विदर्भ विकासासाठी विदर्भ राज्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. शिवसेना ही विदर्भ राज्य निर्मितीसाठी विरोध करीत असल्याने ती सरकारच्या गळ्याची हड्डी झाली होती. शिवसेनेने पुढील काळात स्वतंत्र निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. याच संधीचे सोने विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सरकारने केले पाहिजे. मागणीचा वेळीच विचार न झाल्यास आपण राजीनामाही देऊ, अशी माहिती आ. आशिष देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.आ. देशमुख पुढे म्हणाले, विदर्भ आत्मबळ यात्रा मंगळवार ३० जानेवारीला सेवाग्राम होत वर्धेत दाखल झाली आहे. आतापर्यंत यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधल्यानंतर जनतेमध्ये सरकारबाबत रोष असल्याचे दिसून येते. त्याचे मुख्य कारण वाढती बेरोजगारी व दिवसेंदिवस नवीन उद्याग न येणे आणि जुने उद्योग बंद होणे हे आहे. विदर्भात राज्याच्या तुलनेत ६५ टक्के विजेची निर्मिती होते. परंतु, याच भागातील शेतक-यांच्या कृषीपंपांना अद्यापही मोफत विद्युत पुरवठा देण्यात आला नाही. तेलंगाना सरकार प्रमाणे विदर्भातील शेतकºयांच्या कृषीपंपांना मोफत विद्युत पुरवठा देण्यात यावा. शासनाच्या अनेक योजना असल्या तरी त्याची प्रभावी अंमलबजानी होत नाही. त्यामुळे सरकार बदलली असली तरी ग्राऊंड लेवलवर परिस्थिती जैसे थेच आहे. एखाद्या शेतक-यावर मंत्रालयात जाऊन विष प्राशन करण्याची वेळ येते. या प्रकारामुळे भाजपा सरकारची संवेदन शिलताच हरविली असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादीत करणे सुरू आहे. परंतु, पुन्हा एखाद्या शेतक-यांवर मोबदला न मिळाल्याने आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे. जमीनीचा योग्य मोबदला शेतक-यांना दिला पाहिजे. कर्नाटक राज्यात दुग्ध उत्पादक शेतक-यांला  सरकारच्यावतीने प्रती लिटर ५ रुपये अनुदान दिले जाते. अशाच पद्धतीने राज्यातील शेतक-यांनाही अनुदान द्यावे. सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. साडे सात हजार कोटींच्या कर्जाचा बोझा असलेले राज्य सरकार येत्या काही दिवसांमध्ये विदर्भाचा अनुषेश कसा भरून काढेल हे कळण्यास मार्ग नाही. विदर्भ राज्य व्हावा यासाठी एक दोन वेळा नाही तर तब्बल सात वेळा ठराव घेण्यात आला आहे. परंतु, अद्यापही विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात आली नाही. सरकारने विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी आम्ही या यात्रेच्या माध्यमातून करीत आहो. पक्षाकडून आपल्याला २० डिसेंबरला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचे उत्तर अद्यापही आपण दिले नाही. विदर्भ राज्यासाठी वेळ प्रसंगी राजीनामा देण्याची वेळ आल्यास आपण तोही देऊ, असे याप्रसंगी आ. देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुख