शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
6
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
7
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
8
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
10
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
11
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
12
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
13
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
14
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
15
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
16
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
17
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
18
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
19
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
20
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?

आषाढी एकादशी : देहूगाव येथून आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 13:47 IST

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा....

ठळक मुद्देपादुकांसमवेत संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त आणि सेवेकरी असे वीस वारकरी पंढरपूरला रवाना

देहूगाव : आकर्षक विद्युत रोषणाई, मंदिराला केलेली मनमोहक फुलांची सजावट, पहाटेपासून सुरु झालेली जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांवरचा मंत्रउच्चारायुक्त अभिषेक, पूजा,आरती,कीर्तनसेवा, टाळ मृदंगाचा घोष, रामकृष्णहरी, ज्ञानोबा माऊली तुकारामचा गगनभेदी गजर अशा भक्तिमय वातावरणात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३५ व्या पालखी सोहळ्याचे मंगळवारी( दि.३०) दुपारी एक वाजता श्री क्षेत्र देहू गाव इथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले.या सोहळ््याच्यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम व व हवेली तथा उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर उपस्थित होते. तसेच बारवकर हे श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची समवेत देहू ते पंढरपूर व पंढरपूर ते देहू असे सोहळा बरोबर असणार आहेत.

श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांसमवेत संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त आणि सेवेकरी असे वीस वारकरी पंढरपूरला जाणार आहेत. या सर्वांची वैद्यकीय तपासणी व कोविड 19 चे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या सोहळ्यात तुळशी वृंदावन घेऊन छाया मराठे या एकमेव महिला असणार आहेत.

 देहूगाव येथे मंगळवारी सकाळी पहाटे साडेचार वाजता श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांच्या हस्ते विठ्ठल रूक्मिणी मंंदिर, शिळा मंंदिरातील महापूजा आणि काकड आरती करण्यात आली.  सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची अभिषेक पूजा अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आली. संपूर्ण मंदिराला फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. येथील हनुमान मंदिर राम मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शिळा मंदिर,  महाद्वार याठिकाणी हे सजावट करण्यात आलेले आहे. संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेले आहे.  सकाळी 7.30ते 9.30 या वेळात उद्धव महाराज धन्ने यांचे कीर्तन झाले. सकाळी 10 ते 12 या वेळेत वाटचालीचे भजन भजनी मंडपामध्ये झाले. दरम्यानच्या काळात पादुका घेऊन जाणारी एसटी बसची फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

या अगोदर बॉम्ब शोधक पथक, डॉग स्कॉड पथकाने  या बसची तपासणी केली असून संपूर्ण मंदिर परिसर पिंजून काढला आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, भजनी मंडळ मंदिरातील ओवऱ्या, सोहळ्यातील आवश्यक सर्व वस्तू यांची देखील या पथकाने व पोलिसांनी तपासणी केली आहे. या बसला संपूर्णपणे सोडियम हायपो क्लोराइड व सँनिटाझरने सँनिटाईझ करण्यात आलेले आहे.  मंदिर परिसरातील पालखी मार्गावरील पार्किंग केलेली वाहने हटविण्यात आलेले असून पालखी मार्ग पूर्णपणे मोकळा करण्यात आलेला आहे. पादुका समवेत बंदोबस्तासाठी असलेले पोलीस दल देखील सज्ज झाले आहे. मंदिराकडे येणारे रस्ते लोखंडी अडथळे लावून बंद करण्यात आलेले आहेत.........श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका संस्थांचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे यांनी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका डोक्यावर घेऊन प्रदक्षिणेसाठी मंदिराच्या बाहेर आणल्या. यावेळी उपस्थित वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत मृदंग टाळ यांचा आणि निनाद करत आणि विण्याच्या झंकार करीत पादुका प्रदक्षिणेसाठी रणरणत्या उन्हात भजनी मंडपातून बाहेर आणल्या. पालखी सोहळ्याचे चोपदार नामदेव गिराम यांनी आपला दंड उंचावून पादुका मार्गस्थ करण्याच्या सूचना करताच सेवेकरी पोपट तांबे यांनी तुतारी वाजवली. तुतारी वाजताच पादुका प्रदक्षिणा मार्गावर आणण्यात आल्या वारकरी पाऊल खेळत टाळ-मृदंगाचा गजर करत मुखाने हरिनामाचा गजर करत अतिउत्साहाच्या वातावरणामध्ये पादुका प्रदर्शनासाठी निघाल्या. शिळा मंंदिरासमोर आल्यानंतर श्री संत तुकाराम महाराजांची आरती झाली. येथे पुंडलिका वरदे हारी जयघोष करण्यात आला

टॅग्स :dehuदेहूSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Wariपंढरपूर वारी