नाशिक चे खासदार गोडसे यांच्या कार्यकर्त्याकडून असदुद्दीन ओवेसी यांना मारहाण
By Admin | Updated: March 23, 2017 15:53 IST2017-03-23T15:38:58+5:302017-03-23T15:53:21+5:30
नाशिक येथील गोरख खर्जुल हे दिल्ली येथील संसद भवन बघण्यासाठी गेले असता त्यांना एमआयएमचे खासदार असद्दुदीन ओवेसी यांना मारहाण केल्याची घटना

नाशिक चे खासदार गोडसे यांच्या कार्यकर्त्याकडून असदुद्दीन ओवेसी यांना मारहाण
नाशिक चे खासदार गोडसे यांच्या कार्यकर्त्याकडून असदुद्दीन ओवेसी यांना मारहाण नाशिक : नाशिक येथील शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचे जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे गोरख खर्जुल हे दिल्ली येथील संसद भवन बघण्यासाठी गेले असता त्यांनी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे; मात्र ओवेसी यांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले. खर्जुल यांनी मात्र ओवेसी यांच्या कानशिलात वाजविल्याचा दावा केला आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उलटसुलट उत्तरे दिली व ते नेहमी वादग्रस्त वक्तव्य करतात म्हणून माझा ताबा सुटला व मी त्यांच्या कानाखाली मारल्याचे प्रसारमाध्यमांकडे कबुल केले आहे.