आसाराम बापूच्या समर्थकावर गोळीबार

By Admin | Updated: January 16, 2017 20:26 IST2017-01-16T20:26:12+5:302017-01-16T20:26:12+5:30

आसाराम बापूच्या समर्थकांवर दुसऱ्या गटाच्या युवकांनी धावत्या कारच्या खिडकीतून गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस

Asaram Bapu's supporters fired on | आसाराम बापूच्या समर्थकावर गोळीबार

आसाराम बापूच्या समर्थकावर गोळीबार

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 16 - आसाराम बापूच्या समर्थकांवर दुसऱ्या गटाच्या युवकांनी धावत्या कारच्या खिडकीतून गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी रात्री गोरेवाडा रिंग रोडवर ही घटना घडली. फिर्यादी राजू जोशी (२९) रा. इतवारी यांनी यासंदर्भात गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जोशी हे आसाराम बापूचे साधक आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कळमेश्वर रोड फेटरी येथे आसाराम बापू आश्रम आहे. या आश्रमच्या संपत्तीच्या दुरुपयोगावरून २००७ सली साधकांमध्ये दोन गट तयार झाले आहेत. काही वर्षांपूर्वी राहुल यांना मारहाण सुद्धा झाली होती. तसेच आसाराम बापूच्या न्यायालयीन प्रकरणात वकीलावरून सुद्धा दोन्ही गटामध्ये वाद निर्माण झालेला आहे. फिर्यादी राहुल जोशी गटाचे म्हणणे आहे की, बापूचे प्रकरण आश्रमातीलच एखादा साधक वकील लढण्यास सक्षम आहे. तर दुसऱ्या गटाला असे वाटते की एखाद्या बाहेरचा वकीलांची मदत घेण्यात यावी.

यावरून दोन्ही गट आमोरासमोर आले आहेत. दरम्यान शनिवारी रात्री ९.३० वाजता राहुल जोशी फेटरी येथील आश्रममधून आपल्या कारने (एमएच/४९/बी/३८७३) गोरेवाडा रिंगरोडने घराकडे परतत होते. रिंग रोडवर राहुलच्या कारमागून एक कार ओव्हरटेक करीत आली. कारमध्ये आरोपी मुनीत उर्फ पीयुष आणि त्याचा साथीदार बसले होते. थोडा वेळपर्यंत सोबत कार चालत होती. नंतर अचानक राहुलच्या ड्रायव्हर सीटच्या बंद खिडकीवर गोळीबार करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु सुदैवाने ती गोळी काच फोडून राहुलला स्पर्श करीत निघून गेली. जोशी यांनी रविवारी सायंकाळी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्पोलिसांनी प्राथमिक तपसानंतर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Asaram Bapu's supporters fired on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.