शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadnavis : फडणवीसांनी चूक पकडताच संजय राऊतांची सारवासारव; 'त्या' व्हिडिओवर लगेच स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 21:04 IST

"त्या व्हिडिओसंदर्भात मी नक्की पडताळणी करेन. पण असू शकतो. कारण ते (संजय राऊत) अधूम मधून असे करत असतात."

कालचा दिवस महाराष्ट्रासाठी मोर्चांचा दिवस होता. एकिकडे महाविकास आघाडीने 'महामोर्चा' म्हणत मोर्चा काढला होता. तर दुसरीकडे त्याला प्रत्युत्तर म्हणून, भाजप-शिवसेनेने (शिंदे गट) 'माफी मांगो' म्हणत मोर्चा काढला होता. भाजप नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान होत असल्याचे म्हणत, मविआचे नेते शनिवारी मुंबईत रस्त्यावर उतरले होते. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआच्या या मोर्चाचा उल्लेख 'नॅनो मोर्चा' असा करत खिल्ली उडवली होती. फडणवीसांच्या या टीकेला उत्तर देत राऊतांनी एक व्हिडिओ शेअर केला. पण, तो व्हिडिओ मविआचा नसून, मराठा क्रांती मोर्चाचा आहे, असे म्हणत एका पत्रकाराने फडणवीसांना प्रश्न केला. यावर मी त्याची पडताळणी करेन, असे फडणवीस म्हणाले. यानंतर, आता संजय राऊतांनी यावर तत्काळ ट्विट करत सारवासारव केली आहे. 

राऊत सारवासारव करत म्हणाले "डरो मत!"  -यानंतर आता संजय राऊतांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवर सारवासारव करत, "जरूर चौकशी करा... मराठा मोर्चा सुद्धा महाराष्ट्राची ताकत होती आणि आहे.. महविकास आघाडी मोर्चात ही ताकत सहभागी झालीच होती... करा चौकशी!आपल्या चोर कंपनीला clean cheat देणे आणि राजकीय विरोधकांची चौकशी करणे हाच या सरकारचा एक कलमी कार्यक्रम झालाय! डरो मत!" असे म्हटले आहे.

नेमकं काय घडलं? -खरे तर, काल निघालेल्या दोन्ही बाजूंच्या मोर्चांपैंकी कुणाच्या मोर्चाला अधिक गर्दी होती हे दाखविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसत आहे. यातच फडणविसांच्या 'नॅनो मोर्चा' या टीकेला उत्तर देताना शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्विट करत, 'देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच,' असे म्हटले होते.

मी नक्की पडताळणी करेन -राऊतांच्या या ट्विटसंदर्भात एका पत्रकाराने पत्रकारपरिषदेदरम्यान फडणवीस यांना प्रश्न केला होता. यावर, "तुम्ही नवीनच माहिती देत आहात, मलाही हे माहीत नव्हते. आता संजय राऊतांनी मोर्चाचा जो व्हिडिओ ट्विट केला आहे, तो मराठा मोर्चाचा व्हिडिओ आहे. त्याची मी नक्की पडताळणी करेन. पण असू शकतो. कारण ते अधूम मधून असे करत असतात. कारण मोठा मोर्चा नव्हताच. त्यामुळे त्याचा व्हिडिओ आणायचा असेल तर तो दुसऱ्या मोर्चाचाच ट्विट करावा लागेल," असे फडणवीस म्हणाले.

  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv Senaशिवसेना