अरविंद परुळेकर यांचे निधन

By Admin | Updated: January 7, 2017 05:15 IST2017-01-07T05:15:25+5:302017-01-07T05:15:25+5:30

राज्य गुन्हे अन्वेशन विभागात अपर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झालेले अरविंद परुळेकर यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

Arvind Parulekar passes away | अरविंद परुळेकर यांचे निधन

अरविंद परुळेकर यांचे निधन


मुंबई : राज्य गुन्हे अन्वेशन विभागात अपर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झालेले अरविंद परुळेकर यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
घोडबंदर परिसरात परुळेकर हे पत्नी आणि दोन मुलांसोबत राहायचे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ते अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांच्यावर तेथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मत्यूमुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे. परुळेकर १९८६च्या तुकडीचे होते. त्यांनी जोगेश्वरी पोलीस ठाणे, एस.पी.जी., सहार पोलीस ठाणे, एस बी १, गुन्हे शाखा, काशी मीरा रोड पोलीस ठाणे या ठिकाणी सेवा बजावली आहे. त्यानंतर त्यांनी मुंबईसह नवी मुंबई, रायगड, नागपूर या ठिकाणच्या पोलीस ठाण्यांत यशस्वी कामगिरी बजावली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Arvind Parulekar passes away