शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आपचे अरविंद केजरीवाल यांच्या महाराष्ट्र संकल्प सभेला अखेर परवानगी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 18:07 IST

जिजाऊ जन्मोत्सव दिनी , १२ जानेवारी २०१८ रोजी सिंदखेडराजा या जिजाऊच्या जन्मस्थळी आपचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत संकल्प सभेचे आयोजन केले आहे.

बुलढाणा- जिजाऊ जन्मोत्सव दिनी , १२ जानेवारी २०१८ रोजी सिंदखेडराजा या जिजाऊच्या जन्मस्थळी आपचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत संकल्प सभेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र सरकारच्या राजकीय दबावामुळे, स्थानिक पोलीस यंत्रणेने दोन दिवसांपूर्वी या सभेस परवानगी नाकारली होती. परंतु यानंतर स्थानिक कार्यकर्ते दोन दिवस पोलीस स्टेशनवर ठिय्या देऊन होते. राज्यभर याचे पडसाद माध्यमांमधून उमटल्यावर काल संध्याकाळी उशिरा पोलीस परवानगी देण्यात आली.मागील वर्षभर महाराष्ट्रात शेती, आरोग्य, शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात अस्वस्थता आहे. विकास खुंटला आहे. त्याच बरोबर विविध समाजातील असलेल्या असंतोषाला मोठ्या जनमोर्च्यांनी वाचा फोडली आहे. शेतीचे आणि शेतमालाच्या भावाचे प्रश्न पुढे आले आहेत. या सर्वच आघाड्यावर भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. दुसरीकडे निष्क्रिय कॉंग्रेस आणि तडजोडीचे राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादी, शिवसेना या प्रस्थापित पक्षांकडूनही अपेक्षाभंग झाला आहे. 'नाही रे' वर्गातील अस्वस्थता वर्षारंभी झालेल्या दंगलीतून बाहेर आली आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी महाराष्ट्राच्या राजकारणात पाऊल टाकत आहे.दिल्लीत सत्तेत येताना रिक्षा ड्रायव्हर, असंघटीत कष्टकरी, वंचित समाज, अल्पसंख्याक या सोबत सुशिक्षित आणि उच्चशिक्षित वर्गानेही आप ला पाठींबा दिला होता. त्यानंतर सत्तेत आलेल्या आप सरकारने शिक्षण, वीज, पाणी, आरोग्य या क्षेत्रात दमदार कामगिरी केली आहे. जनतेच्या मुलभूत प्रश्नांना हात घालण्याचा मार्ग महाराष्ट्रातही अवलंबला जाईल. त्यामुळेच शेतीप्रश्नाने अडचणीत आलेल्या मराठवाडा भागात या सभेची सुरवात होत असून ग्रामीण व शहरी वर्गास एकत्र घेऊन पुढे जाण्याचे आप चे धोरण आहे.खडसे, भुजबळ आणि इतर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणाऱ्या आप च्या महाराष्ट्रातील प्रवेशाने राष्ट्रवादी आणि भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्याची सुरवात सभेला परवानगी नाकारण्याने झाली होती. आता १२ जानेवारी रोजी केजरीवाल यांच्या उपस्थितीत होणार्या सभेविषयी सामान्य जनतेच्या मनात उत्सुकता असून आम आदमी पार्टी जनतेच्या मूलभूत अपेक्षा आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या आकांशाचे स्वप्न घेऊन महाराष्ट्रात येत आहे. या सभेनिमित्ताने माजी खासदार ब्रिगेडिअर सावंत त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांबरोबर तसेच अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, सनदी अधिकारी आपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपNew Delhiनवी दिल्ली