अरुणा शानबाग अत्यवस्थ
By Admin | Updated: May 16, 2015 04:41 IST2015-05-16T03:49:03+5:302015-05-16T04:41:48+5:30
परळ येथील केईएम रुग्णालयातील परिचारिका अरुणा शानबाग यांची प्रकृती ढासळल्याने उपचारांसाठी त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे.

अरुणा शानबाग अत्यवस्थ
मुंबई : परळ येथील केईएम रुग्णालयातील परिचारिका अरुणा शानबाग यांची प्रकृती ढासळल्याने उपचारांसाठी त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. अरुणा यांना न्यूमोनिया झाला असून, त्या अत्यवस्थ आहेत.
अरुणा यांची प्रकृती गेल्या
काही महिन्यांपासून स्थिर होती.
तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालवल्यानंतर त्यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. शानबाग यांच्यावर डॉक्टर उपचार करीत आहेत.