शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

Arun Jaitley Death : अरुण जेटलींचं ऐकलं आणि मंत्रिपदाची शपथ घेतली : प्रकाश जावडेकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 19:17 IST

त्यावेळी त्यांच्या सांगण्यानुसार मी दिल्लीतच थांबलो आणि नंतर...

पुणे : सन २०१४ साली मला राज्यसभेचे तिकिट मिळाले नाही म्हणून, मी पुण्याकडे प्रस्थानाच्या तयारीत होतो़. त्यावेळी अरुण जेटली यांनी मला बोलावून, ओ मराठा वीर, तुम्ही एकदम नेहमीसारखे सामान आवरून निघून जाऊ नका ! , निवडणूक झाल्यावर जूनपर्यंत इथेच थांबा़, मे अखेरपर्यंत आपण काय करायचे ते ठरवू़ असे सांगून मला पुण्याला जाण्यापासून रोखले़. त्यावेळी त्यांच्या सांगण्यानुसार मी दिल्लीतच थांबलो आणि नंतर मला नरेंद्र मोदींनी मंत्री पदाची शपथ घ्यायला सांगितले, अशी जेटलींविषयीची हृदयस्पर्शी आठवण केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी '' लोकमत '' शी बोलताना उलगडली.     बहुमुखी प्रतिमा, ओजेस्वी वक्तृत्व, मोजक्या शब्दांमध्ये नेमका संदेश देण्याची कसब आणि अद्भूत स्मरणशक्ती हे अरूण जेटली यांचे विशेष होते़ त्यांच्याशी माझे नेहमीच व्यक्तिगत संबंध असायचे, त्यांचे निधन हा मला मोठा धक्का असल्याचे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले़.  त्यामुळे आपोआपच मध्यप्रदेशातून मी खासदार झालो़.      मी दिल्लीमध्ये पक्षाचा प्रवक्ता म्हणून गेल्यानंतर त्यांच्या नऊ ,अशोका रोड या बंगल्यामध्येच राहत असत़. यावेळी आम्ही सर्व काम करणारे लोक बरोबरच असायचो़.एखाद्या विषयाबाबत जेटलींना केव्हाही माहिती विचारली तर ते लगेच त्या विषयावर दोन ओळीत योग्य मार्गदर्शन करायचे़ राज्य सभेतील त्यांची भाषणे हा एक अनमोल ठेवा आहे़.     जीएसटी कौन्सिलमध्ये सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांना सतत बरोबर घेऊन एकमताने कायद्याचा शब्द न शब्द त्यांनी तयार केला़. नियम तयार करताना, दर ठरविताना तसेच दर महिन्यामध्ये काही सवलती द्यायच्या होत्या. त्याबाबत निर्णय घेतानाही त्यांनी सर्वांना बरोबरच घेऊनच या विषयी एकमताने निर्णय घडवून आणला़.  जीएसटीला काही पक्ष गब्बरसिंग टॅक्स म्हणोत़ पण त्यांचे समर्थन करताना वित्तमंत्री म्हणून अरूण जेटलींनी नेहमीच पाठिंबा दिला़. जेटली यांच्याकडे आम्ही एक मोठे नेतृत्व म्हणूनच पाहिले़. त्यांनी अनेक निर्णयांत नरेंद्र मोदींजींची सतत साथ केली़. आज आमच्यापेक्षा एक वर्षांने लहान असा प्रतिभावंत नेता गेल्याचे दु:ख निश्चित मोठे आहे़. 

टॅग्स :PuneपुणेArun Jaitleyअरूण जेटलीPrakash Javadekarप्रकाश जावडेकरNarendra Modiनरेंद्र मोदीDeathमृत्यू