देशाला कलाकारांची जाण नाही - राज ठाकरे
By Admin | Updated: June 8, 2016 01:52 IST2016-06-08T01:52:28+5:302016-06-08T01:52:28+5:30
युरोपमध्ये जर पंडितजी जन्माला आले असते, तर त्यांचे तिथे संग्रहालय बांधले गेले असते

देशाला कलाकारांची जाण नाही - राज ठाकरे
मुंबई : युरोपमध्ये जर पंडितजी जन्माला आले असते, तर त्यांचे तिथे संग्रहालय बांधले गेले असते. मात्र आपल्या देशात कलाकारांना समजून घेण्याची प्रवृत्ती नाही. मुळात देशाला कलाकारांची जाण नाही, असे परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
दिवंगत चित्रकार एस. एम. पंडित यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन जहांगीर कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी ठाकरे बोलत होते. राज ठाकरे म्हणाले की, एस. एम. पंडित यांच्यासारखा कलाकार पुन्हा होणे नाही. त्यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करणे हा माझ्यासाठी सन्मान आहे.
त्याचप्रमाणे, पंडितजींच्या अमूल्य कलाकृतींचा खजिना कायमस्वरूपी प्रदर्शित केला जावा याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत करण्याचेही आश्वासन त्यांनी
दिले. या वेळी ज्येष्ठ
चित्रकार वासुदेव कामत, पंडितजींचे सुपुत्र कृष्णराज पंडित, नातू आदित्य चारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)