शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
4
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
5
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
6
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
7
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
8
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
9
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
10
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
11
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
12
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
13
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
14
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
15
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
16
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
17
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
18
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
19
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
20
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

लेख: इलेक्ट्रिक वाहनांच्या पार्किंग, चार्जिंगचा जटिल प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 10:12 IST

प्रदूषण कमी व्हावे यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही)च्या प्रसारासाठी प्रयत्नशील आहे.

मनोज गडनीसविशेष प्रतिनिधीप्रदूषण कमी व्हावे यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही)च्या प्रसारासाठी प्रयत्नशील आहे. या वाहनांची खरेदी वाढावी यासाठी जे ही वाहने खरेदी करतील त्यांना यावर अनुदानही देण्यात येत आहे. मात्र, यानिमित्ताने काही वेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतः मुंबईसारख्या शहरात जिथे गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पार्किंगची एक ज्वलंत समस्या असते तिथे इलेक्ट्रिक वाहने घ्यावी की नाही, याबाबत अनेक जण संभ्रमात आहेत. आता हा विषय विस्ताराने जाणून घेऊ.

पहिला मुद्दा असा की, अनेक इमारतींमध्ये पार्किंग मर्यादित आहे. इमारतीमधील पार्किंगची विक्री करता येणार नाही, असा स्पष्ट निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असला तरी या निर्णयाला हरताळ फासून अनेक सोसायट्यांनी पार्किंगची विक्री केली आहे. जेथे पार्किंगची विक्री झालेली नाही अशा ठिकाणी सोसायटीचे सदस्य सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये लॉटरी काढून पार्किंगची अदलाबदल करतात. ज्यांना एकावर्षी पार्किंग मिळते त्यांच्या गाड्या मग इमारतीच्या मोकळ्या आवारात (मोकळे आवार उपलब्ध असेल तर) उभ्या केल्या जातात. अन्यथा इमारतीच्या बाहेरील रस्त्यांवर त्या पार्क केल्या जातात. मुळात एखाद्या व्यक्तीला इलेक्ट्रिक वाहन घ्यायचे असेल, भले ती दुचाकी असेल किंवा चारचाकी, त्याकरिता त्याला डेडिकेडेट पार्किंग मिळणे आवश्यक आहे. कारण त्याचे चार्जिंग युनिट तिथे बसवावे लागते. 

आज मोबाइल तंत्रज्ञान येऊन तीन-साडेतीन दशके झाली. त्यानंतर युनिव्हर्सल पद्धतीचा चार्जर आला. इलेक्ट्रिक वाहनांच्या अनेक कंपन्यांच्या विविध वाहनांकरिता अशा पद्धतीचा युनिव्हर्सल चार्जर आज उपलब्ध नाही. त्यामुळे एका वाहनाला त्याचाच चार्जर लागेल. याकरिताच संबंधित वाहनधारकाला स्वतंत्र पार्किंग लागते. पण सोसायटीमध्ये असलेल्या मर्यादित पार्किंगमुळे सोसायटीला अशा पद्धतीचे पार्किंग उपलब्ध करणे शक्य होणार नाही. त्यामुळे यावर तोडगा कसा निघणार, हा खरा प्रश्न आहे. 

यातील दुसरा मुद्दा असा की, केवळ प्रदूषण कमी व्हावे याकरिता इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल नाही, तर आजच्या घडीला पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी प्रतिलिटर १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. पेट्रोल-डिझेलवरील वाहनांवर मुंबईकरांचा महिन्याला किमान १० हजार रुपयांचा खर्च होतो. त्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांवर वार्षिक खर्च किमान ५ ते ७ हजार रुपये इतका होतो. त्यामुळे इच्छा असूनही पार्किंग व्यवस्थेअभावी ग्राहकाला हे वाहन खरेदी करणे अशक्य होत आहे. इलेक्ट्रिक वाहन, पार्किंग आणि युनिव्हर्सल चार्जर अशा बर्म्युडा ट्रँगलमध्ये ही समस्या तूर्तास अडकलेली आहे.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर