कलम ३७० वरून सेनेचे सरकारला चिमटे

By Admin | Updated: March 3, 2015 00:43 IST2015-03-03T00:43:06+5:302015-03-03T00:43:06+5:30

जम्मू-काश्मीर सत्ता स्थापनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रसंगी कलम ३७० सारखा पारंपरिक मुद्दा बाजूला ठेवून तडजोड करणाऱ्या भाजपवर मित्र पक्षांकडून जोरदार टीका होत आहे़

Article 370 picks up the government government | कलम ३७० वरून सेनेचे सरकारला चिमटे

कलम ३७० वरून सेनेचे सरकारला चिमटे

जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
जम्मू-काश्मीर सत्ता स्थापनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रसंगी कलम ३७० सारखा पारंपरिक मुद्दा बाजूला ठेवून तडजोड करणाऱ्या भाजपवर मित्र पक्षांकडून जोरदार टीका होत आहे़ सोमवारी केंद्रात व महाराष्ट्रात भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनने यानिमित्ताने मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले़ जम्मू- काश्मिरात कलम ३७० बाबत सरकारने काय कारवाई केली? असा खोचक प्रश्न सेनेने राज्यसभेत उपस्थित केला़
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेच्या क्रमात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सरकारला घेरले़ राऊत यांनी मोदी सरकारला सर्वांसाठी समान नागरी कायदा व कलम ३७० चे स्मरण करून दिले़ अभिभाषण सरकारने केलेल्या किंवा भविष्यात करण्यात येणाऱ्या कार्यांची प्रस्तावना-आराखडा असते, असे सांगत ते म्हणाले की, कायदा आणि राज्यघटनेनुसार सर्वांकडे समान भावनेतून बघितले गेले पाहिजे, हे समान नागरी कायद्याचे मूळ तत्त्व आहे़ आम्ही सर्व सरकारच्या ‘सबका साथ, सबका विकास’सोबत आहोत आणि सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे़ मात्र देशातील विविध भागांत शरणार्थ्यांचे जीवन जगणाऱ्या काश्मिरी पंडितांच्या समस्या, त्यांची घरवापसी याबाबतही सरकारने ठोस पावले उचलायला हवीत़

४जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याची भाजपाची पूर्वापार मागणी राहिलेली आहे़ मात्र जम्मू-काश्मिरात पीडीपीसोबत सत्तेत सहभागी होताना भाजपाने कलम ३७० चा मुद्दा थंडबस्त्यात टाकला आहे़

Web Title: Article 370 picks up the government government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.