आरेची मुंबईला पुन्हा ‘एनर्जी’

By Admin | Updated: April 28, 2017 03:33 IST2017-04-28T03:33:23+5:302017-04-28T03:33:23+5:30

गेल्या काही महिन्यांपासून दूधविक्री केंद्रांवरून गायब झालेले आरेचे ‘एनर्जी’ हे सुगंधित दूध पुन्हा उपलब्ध होणार असून तसे आदेश

Arri to return to Mumbai for 'energy' | आरेची मुंबईला पुन्हा ‘एनर्जी’

आरेची मुंबईला पुन्हा ‘एनर्जी’

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून दूधविक्री केंद्रांवरून गायब झालेले आरेचे ‘एनर्जी’ हे सुगंधित दूध पुन्हा उपलब्ध होणार असून तसे आदेश पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिले आहेत.
आरेच्या ‘एनर्जी’ दुधाला मुंबईत प्रचंड मागणी होती. विशेषत: रुग्णालये, शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन्स या ठिकाणी या बाटलीबंद सुगंधित दुधाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असे. असे असताना या दुधाचे उत्पादन अचानक थांबविण्यात आले. त्यामुळे मुंबईतील आरेच्या १८०० दूधविक्री केंद्रांवर खासगी कंपन्यांचे दूध विकले जात आहे. खासगी कंपन्यांचे सुगंधित दूध बाजारात येताच आरेचे ‘एनर्जी’ बंद झाले, हा योगायोग नक्कीच नव्हता. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच मंत्री जानकर यांनी दुग्धविकास खात्यातील अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक घेऊन चांगलीच कानउघाडणी केली.
तसेच खासगी कंपन्यांऐवजी सरकारच्या ‘एनर्जी’ दुधाला ग्राहकांची चांगली मागणी असताना हा ब्रॅण्ड बंद करणे योग्य ठरणार नाही, अशी मागणी आरेच्या दूधविक्री केंद्र चालकांनी मंत्री जानकर यांच्याकडे केली होती.
त्यानुसार ‘एनर्जी’ दुधाचे उत्पादन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दुग्धविकास खात्याने घेतला असून कुतवळ फूड प्रॉडक्टमार्फत हे दूध लवकरच बाजारात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Arri to return to Mumbai for 'energy'