पत्नीचे फोटो अपलोड करणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2016 01:36 IST2016-08-09T01:36:33+5:302016-08-09T01:36:33+5:30

कौंटुबिक वादामुळे रागाच्या भरात स्वत:च्या पत्नीची छायाचित्रे पोर्न साइटवर टाकण्याचे घाणेरडे कृत्य करणाऱ्या पतीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली.

Arrested for uploading wife's photo | पत्नीचे फोटो अपलोड करणाऱ्याला अटक

पत्नीचे फोटो अपलोड करणाऱ्याला अटक

वाकड :कौंटुबिक वादामुळे रागाच्या भरात स्वत:च्या पत्नीची छायाचित्रे पोर्न साइटवर टाकण्याचे घाणेरडे कृत्य करणाऱ्या पतीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील सूसमध्ये राहणाऱ्या दाम्पत्यामध्ये वारंवार वाद होत होते. दोघेही आयटी कंपनीत नोकरीस आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम, परंतु कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांच्यात कायम खटके उडत होते. त्यांच्यातील कौटुंबिक मतभेदामुळे पतीने पत्नीची छायाचित्रे पोर्न साइटवर अपलोड केली. एवढेच नव्हे, तर तिचे वर्णन, तिच्याकडील दोन्ही मोबाइल क्रमांक दिल्याने आणि अश्लील मजकूर टाकल्याने अनोळखी व्यक्ती तिला फोन करू लागल्या. वारंवार येणारे फोन, केली जाणारी विचारणा यांमुळे त्रस्त झालेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी केली. आयपी अ‍ॅड्रेसवरून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, या महिलेचे पोर्न साइटवर फोटो टाकणारी व्यक्ती दुसरी कोणीही नसून, हिंजवडीतील आयटी पार्कमध्ये नोकरी करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या पतीनेच हे कृत्य केल्याचे उघडकीस आले. (वार्ताहर)

Web Title: Arrested for uploading wife's photo