अण्णांना धमकी देणाऱ्याला अटक

By Admin | Updated: June 5, 2016 01:08 IST2016-06-05T01:08:42+5:302016-06-05T01:08:42+5:30

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना धमकी देणारा नेवासा येथील एका लॉजचा मालक ज्ञानेश मोहिनीराज पानसरे (वय ४३) याला पोलिसांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. लष्करे टोळीतील

Arrested threat to Anna Hazare | अण्णांना धमकी देणाऱ्याला अटक

अण्णांना धमकी देणाऱ्याला अटक

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना धमकी देणारा नेवासा येथील एका लॉजचा मालक ज्ञानेश मोहिनीराज पानसरे (वय ४३) याला पोलिसांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. लष्करे टोळीतील लोक त्रास देत असल्याने त्यांना पोलिसांचा त्रास व्हावा, या हेतूने त्यांच्या नावाने अण्णा हजारे यांना धमकी दिल्याची कबुली पानसरे याने दिली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी दिली. धमकीची पत्रे तयार करून पाठविली, अशी कबुली पानसरे याने दिल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले. आरोपीला अटक झाली तरी हजारे यांना दिलेले पोलीस संरक्षण कायम ठेवले जाणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांची हत्या करणारे आरोपी पकडले जावेत; आणि त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी अण्णांनी केली.

Web Title: Arrested threat to Anna Hazare