जहाल नक्षलवाद्याला छत्तीसगडमधून अटक
By Admin | Updated: September 17, 2014 02:27 IST2014-09-17T02:27:45+5:302014-09-17T02:27:45+5:30
जहाल नक्षलवादी राजू उर्फ जेठूराम बुधूराम धुर्वा (41) याला पोलिसांनी छत्तीसगड राज्यात मंगळवारी सकाळी अटक केली.

जहाल नक्षलवाद्याला छत्तीसगडमधून अटक
गडचिरोली : धानोरा तालुक्यात महाराष्ट्र-छत्तीसगड सिमेलगत येनगाव जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना जहाल नक्षलवादी राजू उर्फ जेठूराम बुधूराम धुर्वा (41) याला पोलिसांनी छत्तीसगड राज्यात मंगळवारी सकाळी अटक केली. ही कामगिरी गडचिरोली पोलीस पथकाने पार पाडली आहे.
छत्तीसगडच्या सिमेलगत असलेल्या येनगाव जंगल परिसरात हा जहाल नक्षलवादी पोलिसांच्या हाती लागला. राजनांदगाव जिलच्या मोहल्ला तालुक्यातील खडगावचा रहिवासी असलेला राजू मानपूर डिव्हीजनचा डी. व्ही. सी. सदस्य आहे. औंधी एलओएसचा तो कमांडर आहे. 2क्क्7 नंतर पहिल्यांदाच गडचिरोली पोलीस प्रशासनाला एवढय़ा मोठय़ा कॅडरच्या नक्षलवाद्याला पकडण्यात यश आले आहे. गहनगट्टा चकमकीदरम्यान दलमचा उपकमांडर मारला गेला होता. त्यामुळे हा दलम जवळजवळ संपुष्टात आला असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. छत्तीसगड आणि महाराष्ट्रात अनेक गंभीर गुनंमध्ये राजूचा सक्रीय सहभाग आहे. धानोरा तालुक्यातील सावरगाव, मुरूमगाव, मुंगनेर, पेंढरी आदी भागात नक्षली कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता. दलममध्ये भरती होण्यापूर्वी तो गावात राहून मिलीशीया सदस्य म्हणून काम करायचा. मानपूर डिव्हीजन एसझेडसी, पोलीट ब्युरो सदस्य गुडसा उसेंडी याने पाठवून दिलेले जिलेटीन व स्फोटक पदार्थ तसेच इतर साहित्य वेगवेगळ्या दलमला पोहोचविण्यासाठी मदत करण्याचे कामही राजू करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.