परदेशी महिलेसमोर अश्लील चाळे करणा-या तरूणाला अटक व जामीन

By Admin | Updated: August 19, 2015 16:09 IST2015-08-19T12:04:31+5:302015-08-19T16:09:55+5:30

कुलाबा परिसरात अमेरिकन महिलेसमोर अश्लील हावभाव करणा-या 'त्या' विकृत तरूणाला पोलिसांनी अखेर आज अटक केली आहे.

Arrested and surety for a foreign woman | परदेशी महिलेसमोर अश्लील चाळे करणा-या तरूणाला अटक व जामीन

परदेशी महिलेसमोर अश्लील चाळे करणा-या तरूणाला अटक व जामीन

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - कुलाबा परिसरात अमेरिकन महिलेसमोर अश्लील हावभाव करणा-या 'त्या' विकृत तरूणाला पोलिसांनी अखेर आज अटक केली आहे. त्याला न्यायालयात सादर केले असता न्यायाधीशांनी त्याला पाच हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन दिला आहे.  गोपाळ वाल्मिकी असे त्याचे नाव आहे. या संदर्भात त्या महिलेने कुलाबा पोलिसात तक्रार दाखल केली होती तसेच अश्लील हावभाव करणा-या त्या तरूणाचा फोटो सोशल नेटवर्किंग साईटवरही टाकला होता. 
कुलब्यात राहणारी व एका ऑडिट फर्ममध्ये काम करणारी ही महिला सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडली असता गोपाळने तिच्यासमोर विकृत व अश्लील वर्तन केले. त्या महिलेने आरडाओरडा केल्यावर तेथील एका वाटसरूने व फेरीवाल्याने त्या विकृत तरूणाला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो तरूण निसटला. मात्र त्याचवेळी त्या महिलेने त्या तरूणाचा फोटो क्लिक केला व तो सोशल नेटवर्किंग साईटवर टाकत खंत व्यक्त केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची स्वत: दखल घेतल्यानंतर पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. अखेर आज त्याला अटक करण्यात आली आणि कारवाई सुरू करण्यात आली.

Web Title: Arrested and surety for a foreign woman