आरडीएक्स उतरविणारा आरोपी जेरबंद

By Admin | Updated: August 21, 2015 00:59 IST2015-08-21T00:59:48+5:302015-08-21T00:59:48+5:30

१९९३ मध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोटासाठी गोसबारा येथे शक्तिशाली आरडीएक्स स्फोटके आणि इतर शस्त्रास्त्रांची खेप उतरविण्यात सहभागी असलेल्या आरोपीला

Arrested accused RDX | आरडीएक्स उतरविणारा आरोपी जेरबंद

आरडीएक्स उतरविणारा आरोपी जेरबंद

अहमदाबाद : १९९३ मध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोटासाठी गोसबारा येथे शक्तिशाली आरडीएक्स स्फोटके आणि इतर शस्त्रास्त्रांची खेप उतरविण्यात सहभागी असलेल्या आरोपीला गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाला यश आले. एटीएसने त्याला उत्तर प्रदेशातील बिजनौर येथून अटक केली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएस पथकाने इश्तियाक अहमद अन्सारी (४६) याला त्याच्या किर्तपूर (उत्तर प्रदेश) गावातून मंगळवारी अटक केली. बुधवारी त्याला अहमदाबादेत आणण्यात आले. १९९३ मधील मुंबईतील बॉम्बस्फोटाच्या मुख्य सूत्राधारांपैकी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम एक आहे. बॉम्बस्फोट घडविण्यासाठी दाऊदने पाकिस्तानमधील कराचीतून समुद्रमार्गे गुजरातमध्ये आरडीएक्स, एके-४७ रायफलीसह मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे पाठविली होती. १९९३ मध्ये जामनगर ‘बी’ विभाग पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या एफआयआरनुसार आरडीएक्स आणि इतर शस्त्रास्त्रे गुजरातमधील पोरबंदर जिल्ह्णातील गोसबारा किनारपट्टीवर उतरविण्यात आली होती. तेथून ही स्फोटके आणि शस्त्रास्त्रे दाऊदशी संबंधित लोक आणि इतर कटकारस्थानी लोकांपर्यंत पोहोचती करण्यात आली होती.
त्यावेळी धाडीत पोलिसांना ५ एके-४७ रायफली, एक एके-५६ रायफल, ४३ हातबॉम्ब, ३,०११ काडतुसे सापडली होती. ही स्फोटके आणि शस्त्रे पोरबंदर जिल्ह्णात उतरविण्यात आलेली असली तरी एफआयआर जामनगरमध्ये नोंदविण्यात आला होता.

Web Title: Arrested accused RDX

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.