अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी शिवसेना नेत्यास अटक
By Admin | Updated: September 6, 2014 14:06 IST2014-09-06T12:03:15+5:302014-09-06T14:06:51+5:30
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना नेत्यास अटक केली आहे.

अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी शिवसेना नेत्यास अटक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी काशिमीरा पोलिसांनी वासुदेव नांबियार (वय ६१) या शिवसेना नेत्यास अटक केली आहे. नांबियार हा शिवसेनेचा जिल्हा उपाध्यक्ष आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांबियार चालवत असलेल्या शाळेत पीडित मुलगी नवव्या इयत्तेत शिकते. जानेवारीत नांबियारने तिच्यावर अत्याचार केला व हा प्रकार कोणालाही सांगितल्यास शाळेतून काढण्याची धमकी दिली. पीडित मुलगी गरोदर राहिली व सप्टेंबर महिन्यात प्रसूत ती प्रसूत झाल्यावर हे प्रकरण उघडकीस आले आहे. हा प्रकार कळल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवला असून शुक्रवारी आरोपी नांबीयारला अटक करण्यात आली. त्याला ११ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.