दुतोंडी मांडुळाची विक्री करणाऱ्याला अटक

By Admin | Updated: August 3, 2016 02:38 IST2016-08-03T02:38:30+5:302016-08-03T02:38:30+5:30

लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीला नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष ३ या शाखेने खारघर येथे सापळा रचून जेरबंद केले.

The arrest of the salesman of Danti Mandul is arrested | दुतोंडी मांडुळाची विक्री करणाऱ्याला अटक

दुतोंडी मांडुळाची विक्री करणाऱ्याला अटक


पनवेल : मांडूळ जातीचा दुतोंडी साप घरात ठेवल्यावर धनदौलत, ऐश्वर्य प्राप्त होते, अशी बतावणी करून लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीला नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष ३ या शाखेने खारघर येथे सापळा रचून जेरबंद केले.
नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष ३ च्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती मिळाली होती. पोलीस नाईक सूर्यभान जाधव यांना हेमंत पांचाळ नामक व्यक्ती त्याच्या साथीदारासह मांडूळ जातीच्या सापाची विक्र ी करण्यासाठी येणार असल्याचे खबर मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी खारघर लिटील वर्ल्ड मॉल याठिकाणी सापळा रचला. यावेळी जवळच्या पेट्रोल पंपावर चार तरुण संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. चौकशी केली असता त्यांच्या गाडीतील बॅगेत मांडूळ जातीचा दुर्मीळ साप आढळला.
याप्रकरणी प्रदीप जाधव ( २७, रा. ठाणे) , अभय पाटील ( ५१, रा. वसई), हेमंत पांचाळ ( ३६, रा. खार), नॉवेल दिनोको ( ४२, रा. नालासोपारा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title: The arrest of the salesman of Danti Mandul is arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.