हाऊस आॅफ इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांना अटक
By Admin | Updated: September 6, 2016 20:03 IST2016-09-06T20:03:04+5:302016-09-06T20:03:04+5:30
व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हॉउस आॅफ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या एकूण चार संचालकांना पोलिसांनी अटक केली

हाऊस आॅफ इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांना अटक
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 6 - गुंतवूणकदारांना वार्षिक २४ टक्के व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हॉउस आॅफ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या एकूण चार संचालकांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अजून दोन संशयितांनाही काही तासांत अटक होणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली आहे. भगवंत कोठुळे (रा. तपोवन), महेश सुधाकर नेरकर (रा. नवीन नाशिक), अनिल निवृत्ती कोठुळे (नवीन नाशिक), रवींद्र पुंडलिक दळवी (रा. पंचवटी), दर्शन विजय शिरसाठ (रा. नाशिकरोड), पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य संचालक विनोद पाटील याच्यासह दोघे अद्याप फरार असल्याची माहिती समोर येते आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.