दाभोलकरांच्या संशयित मारेकऱ्याला 10 दिवसांत अटक करा - उच्च न्यायालय
By Admin | Updated: August 4, 2016 13:34 IST2016-08-04T13:34:50+5:302016-08-04T13:34:50+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संशयित मारेकऱ्याला 10 दिवसात अटक करा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिला आहे
_ns.jpg)
दाभोलकरांच्या संशयित मारेकऱ्याला 10 दिवसांत अटक करा - उच्च न्यायालय
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संशयित मारेकऱ्याला 10 दिवसात अटक करा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिला आहे. पानसरे व दाभोलकर या दोघांच्या हत्येला बराच काळ लोटला असून अद्याप तपास न झाल्याबद्दल कोर्टाने सीबीआय व पानसरे हत्येचा तपास करणारी एसआयटी या दोघांनाही धारेवर धरले आहे. दोन्ही हत्यांचा तपास आठ आठवड्यात पूर्ण करा असा आदेश कोर्टाने आज या दोन्ही तपास संस्थांना दिला आहे.
सीबीआयने आज कोर्टाला सांगितले की दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी एक संशयित असून त्याला अटक करण्यात येणार आहे. कोर्टाने 10 दिवसात या संशयिताला अटक करावी असा आदेश दिला.
पानसरे यांच्या हत्येप्रकरणीही काहीजण संशयित असून त्यांचा माग काढणं सुरू आहे आणि त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असे विशेष तपास पथकानं सांगितले.